सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या शहर रोटरी क्लबचे कामकाज आदर्शवत असल्याचे प्रतिपादन अरूण खुटाडे यांनी केले.
येथील जय योगेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात नामपूर रोटरी क्लबच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आगामी काळात ज्येष्ठ नागरिक सभागृहाजवळ ‘रोटरी गार्डन’ उभारण्याचा क्लबचा मानस आहे.
विठ्ठल पगार अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास जगन्नाथ दशपुते, भारतीय जनता पक्षाचे अविनाश सावंत, सहकार सोसायटीचे अरूण खुटाडे, डोंगरसिंग गिरासे, भूविकासक नितीन नेर, किराणा व्यापारी सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष किशोर सोनवणे, जगन्नाथ नेर, साहेबराव सावंत आदी उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष नितेश ह्य़ाळीज यांनी प्रास्तविकातून रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
संदीप सोनजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत बैरागी यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon rotary garden in naampur
First published on: 27-05-2014 at 07:26 IST