शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार असून प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत पुणे विभाग सज्ज झाला असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी गुरूवारी सांगितले. पुणे विभागात वादग्रस्त ठरणाऱ्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळा वगळून इतर सर्व शाळांची प्रवेश प्रक्रिया या वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. त्याबाबत बोलताना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे म्हणाल्या, ‘‘पुणे विभागामध्ये प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या प्रवेश प्रक्रियेबाबत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणारच आहे, परंतु वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यामुळे संकेतस्थळापेक्षा इतर माध्यमातून जागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हास्तरावर नियंत्रण पथक स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १ ते १० जानेवारी या कालावधीमध्ये गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांबरोबर या प्रवेश प्रक्रियेबाबत संवाद साधण्यात येणार आहे. वादग्रस्त शाळा किंवा शहरातील प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवण्याकडे लक्ष देण्यात येईल.’’
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2012 रोजी प्रकाशित
वादग्रस्त शाळांकडे विशेष लक्ष देऊन प्रवेश प्रक्रिया राबवणार
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार असून प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत पुणे विभाग सज्ज झाला असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी गुरूवारी सांगितले.
First published on: 28-12-2012 at 04:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special attention on controversial school for admission process