उद्यापासून राज्यस्तरीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा

वर्धा जिल्हा बुध्दिबळ संघटनेने प्रथमच राज्यस्तरीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ दरम्यान वध्र्यात केले आहे. येथील शिववैभव संस्थेच्या सभागृहात स्पर्धा होतील.

वर्धा जिल्हा बुध्दिबळ संघटनेने प्रथमच राज्यस्तरीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ दरम्यान वध्र्यात केले आहे.
येथील शिववैभव संस्थेच्या सभागृहात स्पर्धा होतील.
१५ वर्षांखालील मुलामुलींसाठी एकूण नऊ फे ऱ्यांमधून सामने होणार असून मुलांचे सामने फि डे-रेटिंग पध्दतीने घेतले जातील.
इच्छूक खेळाडूंनी मंगेश कोपूलवार (९४२१७३१०५२) यांच्याशी संपर्क साधण्याची संघटनेची सूचना आहे.
स्पर्धा आयोजनात बाबाराव लांडगे, चंद्रकांत ढोबळे, प्रा.गिरीश ठाकरे, प्रा.योगेश महंतारे, नाना चौधरी, प्रा.शिवाजी चाटसे, संतोष गुप्ता व अन्य पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: State level sub junior chess competition from tomorrow