पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या क्रीडापटूंची आंतरविद्यापीठ स्पर्धासाठी निवड झाली. त्यापैकी नौकानयनपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
नागपूर येथे महाराष्ट्र राज्य कृषी व अकृषी आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सहभागी होणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या हॅण्डबॉल संघात मविप्र समाजाच्या पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयातील मनोज आथरे, सुरेश जाधव, मनीष बोरस्ते व सुवर्णा जाधव यांची निवड झाली. तसेच पंजाब विद्यापीठाच्या वतीने चंदिगड येथे आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनोइंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या चार खेळाडूंनी पुणे विद्यापीठातर्फे खेळताना चांगली कामगिरी केली. या खेळाडूंमध्ये रामकृष्ण आहेर (कर्णधार), विकास वाळुंज, आकाश गवारे, गोकुळ निकम यांचा समावेश आहे. महाविद्यालयाकडे नौकानयनाच्या विशेष सुविधा नसतानाही खेळाडूंनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील आणि प्रा. पी. एम. खैरनार यांनी मार्गदर्शन केले.