‘साखरसम्राट आणि सहकारसम्राटांचा पक्ष’ अशी ख्याती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता कामगारांचे कल्याण समोर ठेवले आहे. जिल्ह्यात बांधकामासह वेगवेगळ्या क्षेत्रांत असलेल्या सुमारे दोन लाख कामगारांची नोंदणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात येणार आहे. या साठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.
पालकमंत्र्यांसह राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, महापौर प्रताप देशमुख आदींची ठळक अनुपस्थिती या बैठकीस होती. जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिह परिहार, आमदार बाबाजानी दुर्राणी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी खासदार सुरेश जाधव, जि. प. गटनेते बाळासाहेब जामकर आदी पदाधिकारी व जिल्हास्तरावरील नेते बैठकीला हजर होते. रत्नाकर गुट्टे यांच्याविषयी शिवसेना-भाजप आदी पक्षांशी सलगी वाढत असल्याच्या वावडय़ा उठत असतानाच गुट्टे यांनीही काही काळ बैठकीला हजेरी लावली व लगेच ते निघूनही गेले.
तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून कामाला लागण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष भांबळे यांनी केले. आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. वैजयंती वैरागडे, नीलम मोरे, आरती साळवी, राष्ट्रवादी बांधकाम कामगार संघाचे मधुकर िशदे, राजेंद्र नांदोरकर, िहदराव जाधव, दयानंद पाटील, राष्ट्रवादी तांत्रिक कामगार संघाचे श्रीनिवास पांबरकर, दिनेश आदीलकर, सुवर्णकार संतोष कांबळे आदींनी कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची माहिती दिली. चंद्रकांत राठोड, संतोष बोबडे, सारंगधर महाराज आदी प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते. सूत्रसंचालन रमाकांत कुलकर्णी यांनी केले.