सोलापूरचे तापमान ४२ अंशाच्या घरात गेल्यामुळे दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असून यात वाढत्या उष्माघाताने एका वृध्द कामगाराचा बळी घेतला. अ. रहिमान अ. सत्तार उस्ताद (वय ५५, रा. पोगूल मळा, रामवाडी, सोलापूर) असे उष्माघाताने बळी घेतलेल्या वृध्दाचे नाव आहे.
उस्ताद हे देगाव येथील एका सायकल दुकानात कामास होते. दिवसभर काम करून सायंकाळी ते घराकडे परत येत असताना वाटेत उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने ते जुनी गिरणीलगत पापय्या तालमीजवळ थांबले. परंतु तेथेच ते मृतावस्थेतच आढळून आले. फौजदार चावडी पोलिसांनी हा उष्माघाताचा बळी असल्याचे सांगितले.