जाती व्यवस्थेमुळे हजारो वष्रे सफाई कामगारांना घाण साफ करण्याचे काम करावे लागले. आजही भारतीय रेल्वेमध्ये मोठय़ा प्रमाणात मलमूत्र सफाईचे काम याच वर्गाला करावे  लागत आहे. रस्ता ते सरकारी कार्यालयापर्यंत घाण साफ करणारा वर्ग अस्पृश्य आणि जो घाण टाकतो तो स्वच्छ असे का? असा भेदक प्रश्न उपस्थित करीत राज्यघटनेनुसार जाती व्यवस्था संपुष्टात आली तर मग जातीच्या नावावर मत का मागितले जाते? असा खडा सवाल करतानाच सफाई कामगार  हा जाती व्यवस्थेचा बळी ठरल्याची बोचरी टीका इंडियन अ‍ॅक्टिव्हीस  मानवी हक्क आंदोलन, सत्यमेव जयते स्टार टी.व्ही फेम बेजवाड विल्सन यांनी केले.
समता पर्व २०१५चे थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ‘राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत देश के निर्माता’ या विषयावर  पहिले समता वेधसत्र घेण्यात आले. याप्रसंगी विल्सन उद्घाटक म्हणून बोलत  होते.
अध्यक्षस्थांनी डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त अन्न औषधी प्रशासन मुंबई याची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. चोथरीराम यादव, मंगला दिघाडे, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, मधुकर भेसारे, इंजि. दीपक नगराळे, मन्सुर एजाज जोश, ज्ञानेश्वर गोबरे, किशोर भगत, अनिल आडे आदीची उपस्थिती होती.
याप्रसंगी बेजवाड विल्सन, डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते विनोद बुरबुरे यांनी संपादित केलेल्या समतापर्व विशेषांकाचे लोकापर्ण करण्यात आले. सोबतच समतापर्व वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. विल्सन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच  सफाई कामगारांचे आयुष्य प्रकाशमान  झाल्याचे नमूद करीत भारत स्वच्छ अभियान  राबवणाऱ्या राजकीय व्यवस्थेचे  वाभाडे काढले.
हातात झाडू  घेऊन आव आणण्यापेक्षा आपल्या डोक्यातील कचरा साफ करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रस्ताविक समता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगला दिघाडे यांनी केले. पाहुण्यांचा  परिचय अ‍ॅड. मििलद भगत यांनी करून दिला. संचालन अंकुश वाकडे  यांनी तर आभार  इंजि. भीमराव गायकवाड  यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweepers are victim of system
First published on: 14-04-2015 at 07:12 IST