पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नॉयलॉनच्या मांजावर बंदीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी आणला जाईल, अशी ग्वाही महापालिकेचे आरोग्य संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे तलाव आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता महापालिकेने त्यावर बंदी आणली आणि तसा ठरव सभागृहात मंजूर केला होता. नायलॉन मांजामुळे मानव आणि पक्षांच्या जीवाला धोका निर्माण होतो. गेल्या वर्षी तीन व्यक्तींना मांजामुळे प्राण गमवावे लागले. जखमी होणाऱ्यांची संख्याही बरीच असते. मांजामध्ये अडकून सुमारे २०० पक्षी जखमी झाले होते. जखमी पक्षांना वाचविण्याचे प्रमाण फारच कमी आहे. दोनशेपैकी सुमारे ५० पक्षीच वाचविणे शक्य झाले. उडणाऱ्या पतंगांपेक्षा झाडात किंवा तारांमध्ये अडकलेल्या मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. नायलॉन मांजावर बंदीचा प्रस्ताव आणण्याचा विचार असल्याचे डॉ. गणवीर म्हणाले.
नागरिकांनी पतंग उडविताना नायलॉन, चायनीज किंवा काचेच्या मांजाचा उपयोग टाळून पक्षी व मानवांची जिवितहानी टाळावी. सोबतच संक्रातीच्या काळात नागरिकांनी स्वतची काळजी घ्यावी, जखमी पक्षांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी नागरिकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेल्पलाईन तयार
मांजामुळे जखमी होणाऱ्या व्यक्ती व पक्षांवर उपचार करण्यासाठी यंदा प्रथमच महापालिकेने पुढाकार घेतला आहे. जखमी मनुष्य व पक्षांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन तयार करण्यात आल्या आहेत. जखमी व्यक्तीला वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी १०२, ९४२२८३५७१८, ९८६४४४२४०४ या क्रमांकावर किंवा पक्षांवर उपचारासाठी ९७६७९८७७१४, ९४२२१०२८२४ व ९९२३००५६०४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. महापालिका, आयसॉ, व पीटा यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपचारासाठी तीन फिरत्या रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. माहिती मिळताच रुग्णवाहिका मदतीसह घटनास्थळावर पोहोचेल. या मोहिमेतंर्गत जखमी पक्षांवर महालातील महापालिकेच्या पशुचिकित्सालयात निशुल्क उपचार केले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2013 रोजी प्रकाशित
नॉयलॉनच्या मांजावर बंदीचा प्रस्ताव विचाराधीन -डॉ. गणवीर
पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नॉयलॉनच्या मांजावर बंदीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी आणला जाईल, अशी ग्वाही महापालिकेचे आरोग्य संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिली.
First published on: 13-01-2013 at 02:33 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thinking of ban on nylon thread motion dr ganvir