राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तिरुपती बालाजीचा सातवा ब्रम्होत्सव सोहळा उद्या ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला आहे. यावेळी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री तिरूपती बालाजी देवस्थानात सुदर्शन महायज्ञ विजयवाडा येथील यज्ञकेशरी शास्त्रीपूर्ण पराशराम पट्टाभिरामाचार्यालू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता ग्रामसफाई, रक्तदान शिबीर, रात्री ७.३० वाजेपासून विविध पूजा, तर रात्री ८ वाजता कला व वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरीच्या वतीने गोंडी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ९ डिसेंबरला सकाळी ७ वाजेपासून बालाजी पंचामृत अभिषेक, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत वधुवरनिर्णयम, रात्री ८.३० वाजता अल्का दिलीप सदावर्ते प्रस्तूत ‘सांज ये गोकुळी’ हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम, १० डिसेंबरला सकाळी ८ ते ११ पर्यंत नवग्रह पूजा, सकाळी ११ वाजता श्रीनिवास कल्याणम, दुपारी दोन वाजता देणगीदात्यांचा सत्कार अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. कार्यक्रम, ११ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता पूर्णाहुती कार्यक्रम, लायन्स क्लब चंद्रपूर व मेडिकल कॉलेज सेवाग्रामच्या सहकार्याने विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व कृत्रिम मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ वाजता नागपूर येथील कीर्तनकार प्रमोद देशमुख व दत्त मसे यांचे गोपालकाल्याचे कीर्तन, दुपारी चुनाळा येथील सासरी गेलेल्या मुलींचा जावयांसह सत्कार, दुपारी १ वाजेपासून महाप्रसाद रात्री ९ वाजता मोर्शी येथील प्रवचनकार लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाने या सोहळय़ाची सांगता होणार आहे.