‘बोरीचा बार’ ची परंपरा कायम

वाद्यांच्या ठेक्यात हातवारे करीत सुखेड व बोरीच्या महिलांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास ‘बोरीचा बार’ची परंपरा यावर्षीही कायम ठेवली.

वाद्यांच्या ठेक्यात हातवारे करीत सुखेड व  बोरीच्या महिलांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास ‘बोरीचा बार’ची परंपरा यावर्षीही कायम ठेवली.
सुखेड आणि बोरी (ता. खंडाळा) गावाच्या मधून जाणाऱ्या ओढय़ाच्या काठावर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार ‘बोरीचा बार’ भरती. दोन्ही गावांतील महिला या दिवशी समोरा समोर येऊन हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहतात. डफडे, ताशा, शिंग या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर हा बार चालतो. दोन्ही गावांतील महिलांना दुपारी बाराच्या दरम्यान वाजत गाजत मिरवणुकीने ओढय़ाच्या काठावर आणले. त्यानंतर महिलांनी समोरासमोर असणाऱ्या महिलांना हातवारे करीत शिव्याची लाखोळी वाहिली. जोशामध्ये महिला पुढे पुढे सरकत होत्या. त्यांना ग्रामस्थ पाठीमागे ढकलत होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता बोरीचा बार पार पडला. त्यासाठी खूप वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. परंतु येथील महिला आपला पारंपरिक बार दरवर्षी न चुकता साजरा करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traditionl continue of boricha bar

ताज्या बातम्या