बालगंधर्वाचे सोलापुरातील निस्सीम भक्त तथा संगीत व नाटय़कलेचे ध्येयवेडे रसिक सिध्दा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या शनिवारी, १९ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात ‘पेशकार’ च्या माध्यमातून ‘त्रिवेणी सूरसंगम’ हा कार्यक्रम आयोजिला आहे. यात मराठी भावगीते, भक्तिगीते व नाटय़गीतांचा सुरेल स्वरसंगम साकार होणार आहे. यावेळी डॉ. मंजिरी चितळे व हिराताई चौधरी यांचा सन्मान केला जाणार आहे.
नेत्र, कान आणि हृदयास निनवणारी आणि रसिक प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या या मैफलीत प्रशांत देशपांडे, सुधांशू कुलकर्णी, रमा सूर्यवंशी व सावनी कुलकर्णी ही गायक मंडळी सहभागी होणार आहेत. त्यांना ओंकार सूर्यवंशी व संजय बागेवाडीकर यांची तालवाद्यांची तर नागनाथ नागेशी यांची संवादिनी, देवदत्त जोशी यांचे व्हायोलियन तर उमा कुलकर्णी यांची टाळांची साथ मिळणार आहे. संपूर्ण संगीत मैफलीचे निवेदन सुनीता तारापुरे करणार आहेत. पाटील परिवाराने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.