शहरातील हैदराबाद रस्त्यावरील म्हाडाच्या विडी घरकुल वसाहतीमध्ये विहिरीत दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले असून दोघांची ओळख पटली आहे. या दोघांनी अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात आढळून आले.
विडी घरकुलमध्ये सागर चौकात ही विहीर आहे. या विहिरीत शेखर अंबादास कस्तुरे (वय ३५,रा. विडी घरकूल) याने उडी टाकून आत्महत्या केली. विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढताना महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना विहिरीत आणखी दुसरा मृतदेह हाती लागला. प्रभाकर जयराम बाबरे (वय 32, रा. विडी घरकूल) असे त्याचे नाव आहे. प्रभाकर दोन दिवसापासून घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने त्याचा शोध घेतला जात होता. अखेर तो मृत अवस्थेत विहिरीत आढळून आला. अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
प्राध्यापकाचे घर फोडले
शहरात भवानी पेठेतील स्टेट बँक कॉलनीमध्ये श्रध्दा अपार्टमेंटमधील बंद सदनिका फोडून चोरटय़ांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, दूरदर्शन संच, कॅमेरा, लॅपटॉप असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लांबविला. दयानंद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एस.के.चव्हाण हे या सदनिकेत राहतात. चोरटय़ांनी दुपारी उशिरा ही सदनिका बंद असल्याची संधी साधून चोरी केली. शहरात अलीकडे घरफोडय़ांचे प्रमाण आटोक्यात न येता वाढत चालले आहेत. अलीकडेच कर्णिक नगरात संध्या जहागीरदार यांचे घर फोडून चोरटय़ांनी २१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2013 रोजी प्रकाशित
सोलापूरच्या विडी घरकुलात विहिरीत दोन तरुणांचे मृतदेह
शहरातील हैदराबाद रस्त्यावरील म्हाडाच्या विडी घरकुल वसाहतीमध्ये विहिरीत दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले असून दोघांची ओळख पटली आहे. या दोघांनी अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात आढळून आले.
First published on: 25-08-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youngsters dead body in solapur vidi gharkul well