मुंब्रा येथील कौसा तसेच दौलतनगर भागातील चार अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा मारला असून या कारवाईसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंब्रा तसेच दिवा भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मंगळवारी दिवा तसेच कौसा भागातील चार अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण पथकाने कारवाई केली. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाईसाठी परिसरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा, १०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी दिवा तसेच कौसा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये आरसीसी तळमजल्याची इमारत पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आली. तसेच तळ अधिक एक मजली इमारतही तोडून टाकण्यात आली. याच परिसरातील चार मजली इमारतीचे कॉलम व भिंतीचे बांधकाम तोडण्यात आले. दौलतनगर येथे तळ अधिक चार मजल्यांच्या व्यापत असलेल्या पाचव्या मजल्याचे बांधकामही तोडण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंब्य्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
मुंब्रा येथील कौसा तसेच दौलतनगर भागातील चार अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा मारला असून या कारवाईसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
First published on: 12-12-2012 at 09:13 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorised construction demolished in mumbra