शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  दि. २३ जानेवारी ते  २३ फेब्रुवारी अशा भगव्या मासाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर सक्रिय सदस्य नोंदणीसह विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करून बाळासाहेबांचे विचार सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन कराड दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशीद यांनी केले.  
मलकापूर येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते. मलकापूर शहरप्रमुख तानाजी देशमुख, मधुकर शेलार, दिलीप यादव, शशिकांत हापसे, आनंदराव डांगे, सुनील शिंदे, सूर्यकांत पाटील, विनायक भोसले, शशिराज करपे, नरेंद्र लोहार, विक्रम पवार, चंद्रकांत सुतार, रणजित पाटील, सूर्यकांत मानकर यांची या वेळी उपस्थिती होती.
जयंतीदिनाचे औचित्य साधून येत्या बुधवारी (दि. २३)  गावोगावी संपर्क अभियान, शाखा वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विविध शाळांमधून शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात येणार असून, ठिकठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही काशीद यांनी या वेळी दिली. प्रमोद तोडकर यांनी सूत्रसंचालन केले. सतीश तावरे यांनी आभार मानले.