महाराष्ट्रदिनानिमित्त सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस, गृहरक्षक दलाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली.
येथील शाहू स्टेडियमवर हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. या वेळी पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली व पोलीस दल, गृहरक्षक दलाची मानवंदना स्वीकारली. या वेळी विविध पथकांनी संचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
पाटील यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्या खेळाडूंचा, पोलीस दलात विशेष कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच सहा महाराष्ट्र छात्रसेनेच्या मुला-मुलींचा व प्रमुख मेजर डॉ. रूपा शहा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कागल तालुक्यातील सोनाळी गावचे सरपंच सत्यजित बाळासाहेब पाटील व ग्रामसेवक सागर पार्टे यांना लोकराज्य ग्राम केल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजयसिंह मंडलिक, महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष िहदुराव चौगले, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा व सत्र न्यायाधीश वि. रा. लोंढे, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, जिल्हा समादेशक विलासराव पाटील कौलवकर, स्वातंत्र्यसनिक, नगरसेवक उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’मध्ये प्रसिद्ध झालेले महाराष्ट्रगीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले.