पनवेलमध्ये निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या संशयित वाहनांना थांबवून त्या वाहनांची तपासणी केली जात आहे. अशी सहा पथके निवडणूक आयोगाने तैनात केली आहेत.
या पथकामधील तीन पथकांमध्ये पोलिसांचा समावेश आहे. सध्या या पथकाकडे वाहने आणि छायाचित्रीकरणाची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना यामुळे थोडासा त्रास होईल पण आपल्या खासगी मोटारींवर विनापरवानगी राजकीय स्टिकर लावू नयेत याबाबतही मोटारचालकांना सूचना दिल्या जातात. मोठय़ा रकमेची वाहतूक राजकीय पक्षांना विनापरवानगी करता येऊ नये यासाठी निवडणूक आयोग रस्त्यावर उतरले आहे.
पनवेलचे निवडणूक अधिकारी पवन चांडक यांनी पुढाकार घेऊन सामान्य मतदारांना भ्रष्ट प्रणालीला रोखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेच्या भंग करणाऱ्या विरोधात मदतीचे आवाहन केले आहे. सामान्य मतदार आणि नागरिकांना आपल्या जवळच्या परिसरात निवडणूक काळात कोणताही आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसल्यास संबंधित नागरिकाने ०२२-२७४५२३९९ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे हे आवाहन केले आहे. नागरिकांनी सांगितलेल्या घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी कल्याणी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पथक काही क्षणात घटनास्थळी पोहचणार असल्याचे अधिकारी सचिन राऊत यांनी सांगीतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch on political parties by special team
First published on: 23-09-2014 at 07:05 IST