सर्वागीण विकासकामे करून महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक २१ हा आदर्शवत ठरेल, या दृष्टीने प्रयत्न करू, असा विश्वास नगरसेवक विक्रांत मते यांनी व्यक्त केला आहे. कामगारनगरमधील रस्ताकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
संत कबीरनगरमध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती असणारी जनता तसेच कामगारनगरमधील मध्यमवर्गीय नागरिक, याशिवाय इतर भागातील उच्चभ्रू, अशा तीनही स्तरातील नागरी वसाहती आहेत, परंतु विकासकामे करताना कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता सर्वच भागांत समान पातळीवर कामे करून सर्वाचा विश्वास संपादन करू, यामुळे आपला प्रभाग शहरात आदर्श ठरेल, असा आत्मविश्वास मते यांनी व्यक्त केला.
प्रास्तविक डी. डी. जाधव यांनी केले. आभार राष्ट्रवादी पक्षाचे प्रभाग अध्यक्ष संदीप हांडगे यांनी मानले. या वेळी २५ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ताकामाचे उद्घाटन करण्यात आले.