कार्तिक एकादशीनिमित्त ऐतिहासिक वढा जुगाद या गावी वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर भव्य यात्रा भरली. या यात्रेत भाविकांनी देवाचे दर्शन घेतले.  
 शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक वढा जुगाद हे गाव आहे. या गावाला लागून वर्धा व पैनगंगा या दोन्ही नद्या वाहत असून तेथेच यांचा संगमही आहे. या संगमावर दरवर्षी कार्तिक एकादशीला भव्य यात्रा भरते. यात वढा गावालगतच्या गावातील, तसेच घुग्घुस, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, राजुरा, बल्लारपूर येथील भाविक हजेरी लावतात. संगमात आंघोळ केल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन भाविक पूजाअर्चा करतात. यंदाही आज येथे भरगच्च यात्रा भरली. या यात्रेत विविध दुकानांसोबतच खाण्यापिण्याचे स्टॉल्स व इतर वस्तूही मिळतात. ग्रामीण भागातील लोकांसाठी या यात्रेचे महत्व वेगळेच आहे.