मालाडमध्ये किरकोळ वादातून सोमवारी रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. बांगूर नगर पोलिसांनी कसलाही दुवा नसताना आरोपींना अवघ्या तीन तासांत अटक केली.मालाड गोरेगाव लिंक रोडवरील लक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या महेश नायडू (३०) याची सोमवारी रात्री कुणीतरी लोखंडी सळईने मारहाण करून हत्या केली. त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. मयत नायडू याचे काही दिवसांपूर्वी या भागातील एका गॅरेजवाल्याशी भांडण झाले होते. त्यादृष्टीने उमेश गिरी याची माहिती मिळाली.मात्र उमेश गिरी याचा मोबाइल बंद होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे (गुन्हे) यांनी तात्काळ खबऱ्यांचे जाळे पसरवून आरोपींची माहिती मिळविली. आरोपी मुंबईबाहेर पळून जात असतानाच उमेश गिरी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2015 रोजी प्रकाशित
तरुणाच्या हत्येनंतर तीन तासांत आरोपींना अटक
मालाडमध्ये किरकोळ वादातून सोमवारी रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.
First published on: 19-08-2015 at 12:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man accused of killing arrest after three hours