शहादा-प्रकाशा रस्त्यावरील करजई गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात येथील ओम विष्णू शर्मा (२७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
ओम हा ओम ट्रॅव्हल्सचे मालक विष्णू शर्मा यांचा मुलगा आहे. ओम आपला चुलतभाऊ माधव आणि मित्र विकास गुरूबक्षानी यांना सोबत घेऊन  कारने  नंदुरबार येथे गेले होते.
परतीच्या मार्गावर रात्री त्यांचे वाहन करजई गावाजवळ रस्त्यावरील सूचना फलकावर आदळले. त्यामुळे चालक ओम याचा ताबा सुटल्याने चार ते पाच उलटून  गाडी   पूर्णपणे उलटी झाली.
या अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला. तर माधव व विकास हे जखमी झाले. माधवला गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.