जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध..
इव्हेन्ट मॅनेजमेंट या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योग- व्यवसायांपकी एक महत्त्वाचा उद्योग मानला जातो. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पुढील एक-दोन वर्षांत या उद्योगाची वार्षकि उलाढाल ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. इतर उद्योगक्षेत्रांत मंदीचे वातावरण असताना या क्षेत्राची वार्षकि वाढ मात्र १४ ते १५ टक्के आहे. त्यातही वेिडग इव्हेन्ट प्लॅिनग क्षेत्रातील वाढ अधिक दिसून आली आहे.
या क्षेत्रातील उलाढाल १८०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राला नवी झळाळी मिळत असून निर्मिती, प्रदर्शने, विपणन आदी सर्व बाबतीत अधिकाधिक सफाईदारपणा आणि व्यावसायिकता आली आहे.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने इव्हेन्ट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमास कौशल्य विकास अभ्यासक्रम म्हणून मान्यता प्रदान करण्याची मागणी आता होत आहे. काही इव्हेन्ट कंपन्यांची वार्षकि वाढ १०० टक्क्यांहून अधिक आहे. व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट इव्हेन्ट्समध्ये सातत्याने होणारी वाढ, व्यक्तिगत इव्हेन्ट्समध्ये सढळ हाताने केला जाणारा खर्च, थीम पार्टी आयोजित करण्याकडे व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट ग्राहकांचा वाढलेला कल यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत.
संभाव्य संधींचा विचार केल्यास या क्षेत्रातील विविध कालावधीचे अभ्यासक्रम करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. इव्हेन्ट मॅनेजमेंटद्वारे ग्राहकांशी थेट संपर्क साधता येत असल्यामुळे अनेक कंपन्याही लहानसहान बाबींच्या आयोजनासाठी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतात. विविध चित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शो, पुरस्कार प्रदान समारंभ आदींच्या आयोजनाची जबाबदारी अशा कंपन्यांकडे दिली जाते.
या अशा विविध प्रकारचे सोहळे साजरे करण्याचे कौशल्य व तंत्र भारतीय इव्हेन्ट मॅनजमेंट कंपन्यांनी प्राप्त केले असून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही या क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांच्या कौशल्याची दखल घेण्यात येत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सोहळ्यांच्या, परिषदांच्या आयोजनाची जबाबदारी भारतीय कंपन्यांना प्राप्त होऊ लागली आहे.

अभ्यासक्रमाविषयी..
इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात संवादकौशल्य, जनसंपर्क, सादरीकरण कौशल्य, इव्हेन्ट नियोजन, प्रायोजकत्व प्राप्ती व अर्थनियोजन, इव्हेन्ट विपणन, ब्रँडिंग, इव्हेन्ट टीम मॅनेजमेंट, इव्हेन्ट निर्मिती, संसाधनांची जुळवाजुळव, इव्हेन्टसाठी आवश्यक असणारे कायदे, परवानगी, कार्यपद्धती, नियम, लग्न सोहळे, लाइव्ह शो, कॉर्पोरेट इव्हेन्ट्स, वैशिष्टय़पूर्ण सोहळ्यांचे आयोजन, सोहळ्याचा समन्वय, माध्यमांचा समन्वय, कॅटिरग मॅनेजमेंट, मनुष्यबळ व्यवस्थापन, जनसंपर्क, जाहिराती यांसारख्या विषयांचा समावेश असतो.

करिअर संधी
इव्हेन्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात- इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी, फॅशन हाऊस, मार्केटिंग कंपन्या, म्युझिक कंपन्या, टीव्ही चॅनेल्स, मूव्ही, सीरियल प्रॉडक्शन कंपन्या, शॉिपग मॉल्स, सुपर मार्केट्स, रेडियो स्टेशन्स, स्टार हॉटेल्स, रिसॉर्ट््स, क्लब, स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपन्या, सुपर स्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्स, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कंपन्या, एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट, मीडिया- पब्लिकेशन्स, जनसंपर्क संस्था, न्यूजपेपर इंडस्ट्री, कॉर्पोरेट हाऊसेस, एक्सपिरिमेंटल मॅनेजमेंट कंपनी.
हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढीलप्रमाणे विविध पदांवर काम करता येऊ शकते- इव्हेन्ट प्लॅनर, इव्हेन्ट को-ऑíडनेटर, इव्हेन्ट मॅनेजर, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, सेलिब्रिटी मॅनेजर, अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, एच.आर. मॅनेजर, ब्रॅण्ड अ‍ॅण्ड इमेज स्पेश्ॉलिस्ट, रिसोस्रेस पच्रेस मॅनेजर, कन्सल्टंट, फायनान्स मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह.

पर्ल अ‍ॅकॅडेमी- या संस्थेने एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन अ‍ॅण्ड इव्हेन्ट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम संस्थेच्या दिल्ली कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे.
संपर्क- पर्ल अ‍ॅकॅडेमी, ए-२१/२३, नारैना इंडस्ट्रिअल एरिया, फेज टू, न्यू दिल्ली- ११००२८.
ईमेल- counsellor@pearlacademy.com
संकेतस्थळ- pearlacademy.com

अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी- या संस्थेने एम.ए. इन पब्लिक रिलेशन अ‍ॅण्ड इव्हेन्ट मॅनेजमेंट हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क- अ‍ॅमिटी अ‍ॅडमिशन ऑफिस, अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी कॅम्पस, गेट नंबर- ३, ब्लॉक-जे २, ग्राऊंड फ्लोअर, सेक्टर- १२५, नॉयडा, उत्तरप्रदेश- २०१३१३.
संकेतस्थळ- http://www.amity.edu

के. सी. मिहद्र शिष्यवृत्ती
परदेशातील नामवंत विद्यापीठात अथवा शिक्षणसंस्थेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिष्यवृत्तीसाठी ५० उमेदवारांची निवड केली जाते.
अर्हता- पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळालेली असावी.
संपर्क- के. सी. मिहद्रा एज्युकेशन ट्रस्ट, सेसिल कोर्ट, रीगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग- ४००००१.
संकेत स्थळ- http://www.kcmet.org

ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट
दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सटिीतील बी.ए.- एलएलबी (ऑनर्स), एलएलएम आाणि पीएच.डी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांसह मुंबई येथेही घेतली जाईल. संपर्क- नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी,
सेक्टर- १४, द्वारका, न्यू दिल्ली- ११००७८.
संकेतस्थळ- nludelhi.ac.in
ईमेल- info@nludelhi.ac.in

वेगळ्या प्रकारचे एमबीए
अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सटिीने एमबीए इन बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स आणि एमबीए इन बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स, एमबीए इन मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, एमबीए इन मीडिया इनोव्हेशन, एमबीए इन बिझनेस इनोवेशन अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी हे नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कालावधी- प्रत्येकी दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी.
संपर्क- अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सटिी, चारोळी बुद्रुक व्हाया लोहगाव पुणे- ४१२१०५.
संकेतस्थळ- adypu.edu.in
प्रवेशासाठी CAT/ MAT/ CMAT/ G MAT/ ATMA या परीक्षांमधील गुण ग्रा धरले जातात. राज्य शासनातर्फे घेण्यात एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएच- सीईटी परीक्षेचेही गुण ग्रा धरले जातात.