देशातील एकूण कारविक्रीत हॅचबॅक सेगमेंटमधील कारचा टक्का सर्वाधिक आहे. परिणामी यामध्ये अनेक मॉडेल उपलब्ध असून, स्पर्धाही जोरदार आहे. या कारचा सेगमेंट अगदी छोटय़ा कारही म्हणजे नॅनो, अल्टो, क्विड ते बलेनो, आय २०, अशा प्रीमियम हॅचबॅकपर्यंत आहे. यातील नॅनो कार आणि बलेनो हा प्रीमियम हॅचबॅक कारप्रकार भारतीय बाजारपेठेला नवीन असला तरी कंपन्यांच्या दृष्टीने आश्वासक आहे. प्रीमियम कारमधील वैशिष्टय़े हॅचबॅकमध्ये मिळत असून त्यासाठी अधिक पसे देण्यासही भारतीय ग्राहक तयार आहेत. त्यामुळे देशाची कार बाजारपेठ सुधारत आहे. एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कारमधील तीन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पर्याय कोणते आहेत, ते आपण पाहूयात.

लाखातील कार म्हणून असलेली नॅनो ग्राहकांना फारशी रुचलेली नाही. त्यामुळे या कारमध्ये अनेक बदल टाटा मोटर्सने करूनही तरुणाई याकडे आकर्षति झालेली नाही. नॅनोला साडेसहाशे सीसी क्षमतेचे इंजिन असून, मायलेजही पंचवीसपेक्षा अधिक आहे. कंपनीने एसी, पॉवर िवडोज, पॉवर स्टिअिरगसारखी फीचर कारमध्ये दिली आहेत. तसेच, प्रामुख्याने शहरांतर्गत वापरासाठी कारचा उपयोग करणाऱ्यांसाठी एएमटी पर्यायचे नॅनोचे मॉडेल उपलब्ध आहे. आकाराने लहान तरीही चार व्यक्ती सहज प्रवास करू शकतील, उत्तम मायलेज सुमारे १८ ते २२ केएमपीएल (रस्त्यावरील परिस्थिती, चालविण्याची सवय यानुसार यात फरक पडतो), सर्वात स्वस्त (एएमटी पर्यायामधील किमतीच्या आधारावर), घरातील दुसरी कार म्हणून नॅनो एएमटी मॉडेल चांगले आहे. शहरातील वापरासाठी कार तसेच कधीतरी अडीचशे ते पाचशे किलोमीटर बाहेरगावचा प्रवास करणाऱ्यांनी ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) सर्वात स्वस्त पर्यायाची ‘टेस्ट ड्राइव्ह’ घेऊन निर्णय घ्यावा. कारण, मारुती के १०, रेनॉ १ लिटर एएमटी पर्याय उपलब्ध आहेत. नॅनो एएमटीची किंमत तीन लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू आहे. अल्टो के १० ची किंमत ४.३० लाख रुपयांपासून, तर क्विड एएमटीची किंमत ३.८४ लाख रुपयांपासून आहेत. या दोन्ही कारचे मायलेज २२ किमी प्रतिलिटरच्या पुढे आहे. शहरात वापरण्यासाठी आणि लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी या उपयुक्त आहेत. या दोन्ही कारना एक हजार सीसीचे इंजिन आहे. नॅनोमध्ये लगेज स्पेस हा मोठा प्रश्न आहे. त्या तुलनेत के १०, क्विड एएमटीमध्ये बूट स्पेस २५० लिटरच्या पुढे आहे. तसेच,  नॅनोच्या तुलनेत या कारचे डिझाइिनग, केबिन स्पेस, एसी, पॉवर अधिक आहे. तसेच, यातील क्विडचे डिझाइिनग हे एसयूव्ही प्रेरित असल्याने जास्त अपििलग आहे आणि के १० च्या तुलनेत किंमत कमी आहे. त्यामुळे नॅनो आणि के १०च्या मधील सक्षम एएमटी पर्याय म्हणून क्विड एएमटी नक्कीच पसंत आहे.

वॅगन आर

वॅगन आर, सेलेरियो आणि रिट्झ या मारुतीच्या ‘टॉल बॉय बॉडी’ प्रकारातील कार एन्ट्री लेव्हल हॅचबॅकमध्ये आहेत. सेलेरियो ही २०१४ मध्ये लाँच झालेली असून, ही सर्वात नवी कार आहे. कारण वॅगन आर आणि रिट्झ या मारुतीच्या जुन्या मॉडेलपकी आहेत. यातील वॅगन आरचे पारंपरिक आणि स्टिंग-रे हे सुधारित (प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्टाइिलग आदी फीचर) व्हर्जन असून, दोन्हींना एक हजार सीसीचे इंजिन आहे. ‘ब्लू आइड बॉय’ म्हणून वॅगन आर ओळखली जाते आणि अजूनही या कारला ग्राहकांची पसंती आहे. वॅगन आरची लांबी ३५९९ एमएम, रुंदी १४९५ एमएम, उंची १७०० एमएम, बूट स्पेस १८० लिटर असून, किंमत ४.४२ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे. स्टिंग रेची लांबी ३६३६ एमएम, रुंदी १४७५ एमएम, उंची १६७० एमएम, बूट स्पेस १८० लिटर असून, किंमत ४.८३ लाख रुपयांपासून आहे. वॅगन आर एएमटी आणि सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये एबीएस, ईबीडी, एअरबॅग्स ही सुरक्षेची महत्त्वाची फीचर नाहीत. त्यामुळे पाच लाख रुपयांचे बजेट असणाऱ्यांनी थोडे बजेट वाढवून सुरक्षित कारच्या पर्यायाचा विचार करायला हवा. कारण पसे कमविता येतात, तर आयुष्य जगण्याची संधी एकदाच असते. कंपनीने रिट्झ, सेलेरियो कारना एबीएस अर्थात अँटी ब्रेकिंग सिस्टीम, एअरबॅग्सचा पर्याय दिला आहे. यातील फक्त रिट्झ च्या टॉप मॉडेलला, तर सेलेरियोमध्ये एंट्री लेव्हल पर्यायापासून ही सेफ्टी फीचर किमान अतिरिक्त पसे भरून घेता येतात.

रिट्झ : युरोपियन रचनेची झलक

या कारचे स्टाइिलग हे युरोपीय शैलीची असून, पोझिशिनगही तसेच करण्यात आले. मात्र, या कारला बाजारपेठेतून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. रिट्झला के सीरिजमधील १२०० सीसीचे आणि १३०० सीसीचे डिझेल इंजिन आहे. त्यामुळे कारचा पिकअप अधिक आहे. डिझेल इंजिनचे मायलेज १८-२२ केएमपीएल, तर पेट्रोलचे मायलेज १४-१७ केएमपीएल आहे. एबीएस, एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ओआरव्हीएम्स, मीडिया प्लेअर आदी फीचर देण्यात आली आहेत. कारची किंमत ४.८९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने आता कॅबसाठीही ही कार उपलब्ध केली आहे. रिट्झ हे जुने मॉडेल असून, या कारचे भवितव्य स्पष्ट नाही. त्यामुळे या कारपेक्षा मारुतीमधील सेलेरियोचा पर्याय चांगला वाटतो.

सेलेरियो

ए स्टार आणि झेन एस्टिलो या कारचा मेळ सेलेरियोत घालण्यात मारुतीला यश आल्याचे डिझाइनवरून स्पष्ट होते. तोंडवळ्याकडे पाहिल्यावर कार मोठी असल्याचा आभास होतो. कारचे इंटीरिअर ब्लॅक व बेइज रंगातील असल्याने कार आकर्षक वाटते. के सीरिजमधील १ हजार सीसीचे इंजिन असून, सेलेरियोचे मायलेज २३ केएमपीएल आहे. सेलेरियो एएमटी आणि सीएनजी पर्यायात उपलब्ध आहे. सेलेरियो मॅन्युअल व्हर्जन किंमत ४.१२ लाख (एक्स-शोरूम), एएमटी व्हर्जन ४.८१ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे. सेलेरियोमध्ये डिझेलचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने अखेर डिझेल मॉडेल बंद करण्यात आले आहे. स्टाइल, फीचरमुळे सेलेरियोला बाजारपेठेतून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.

हॅचबॅक

या सेगमेंटमध्ये पहिल्यापासूनच मारुती सुझुकीचा दबदबा कायम राहिला आहे. ह्य़ुंदाई मोटर्सने सँट्रो आणि नंतर आय १० या कारच्या माध्यमातून स्वतची ओळख नक्कीच निर्णाण केली आहे. पण, आता या दोन्ही कार या सेगमेंटमध्ये नाहीत. सँट्रोचे उत्पादन बंद होऊन दोन ते तीन वष्रे झाली असून, आय १०चे उत्पादन बंद होत असल्याचे ह्य़ुंदाईने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये आता फक्त मारुती आणि टाटा मोटर्सच आहेत. टाटा मोटर्सने दशकाहून अधिक कालावधीनंतर नवी कार टियागोच्या रुपात लाँच केली आहे.

टियागोविषयी..

टियागो कारला रेसिंग कारमधून प्रेरणा घेऊन तसा लूक दिला आहे. हनीकोंब ग्रिल, बोनेटच्या डिझाइनमुळे ही कार पुढील बाजूने एंट्री लेव्हल सेडान कार असल्याचा भास निर्माण करते. त्यामुळे या सेगमेंटमधील अन्य कारच्या तुलनेत मोठी वाटते. कारचे इंटीरियर काळ्या रंगातील असून, हार्मन कार्डनची इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. प्रथमच या सेगमेंटमधील कारमध्ये अशी सिस्टीम उपलब्ध झाली आहे. मोबाइल, यूएसबी, आयपॉड आदी गॅजेट्स कनेक्ट करता येतात आणि नॅव्हिगेशन सिस्टीमही आहे. स्टिअिरग माऊंटेड ऑडियो-फोन कंट्रोल, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम दिले आहे. कारची बूट स्पेस २४५ लिटर आहे. टियागोला टाटा मोटर्सने स्वत विकसित केलेले रेव्हट्रॉन सीरिजमधील १२०० सीसीचे पेट्रोल आणि १०५० सीसीचे डिझेल इंजिन बसविले आहे. १.२ लिटरच्या थ्री सििलडर (तीन पिस्टन) इंजिनला ८५ पॉवर आणि ११४ न्यूटन मीटर (एनएम) कमाल टॉर्क मिळतो. कार चालविताना आपण खरेच टाटा मोटर्सची कार चालवत आहोत का, असा प्रश्न पडू शकतो. कंपनीने इंजिनच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केल्याचे जाणवते. गीअर शिफ्ट इंडिकेटर दिला आहे. टियागोला चांगले मायलेज मिळण्यासाठी सिटी आणि इको मोड पर्याय दिला (एंट्री लेव्हल हॅचबॅग सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच) असून, पेट्रोल कार प्रति लिटर २३.८४ किमी (किलोमीटर) जास्त मायलेज देते, असा दावा कंपनीचा आहे. एबीएस, ईबीडी व कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल (पहिल्यांदाच कोणत्याही एंट्री लेव्हल हॅचबॅक कारमध्ये देण्यात आलेली फीचर), एअरबॅग्सची सेफ्टी फीचर या कारमध्ये दिली आहे. मात्र, यासाठी पसे मोजावे लागतात. कंपनीने टियागोचे नुकतेच एएमटी मॉडेल लाँच केले आहे. टियागोची किंमत ३.४० लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, राज्य व शहर, मॉडेलनुसार फरक) आहे.

टेस्ट ड्राइव्ह घ्या अन् ठरवा

टाटा मोटर्सच्या इंडिकाबाबत असलेल्या टॅक्सी वा कॅबच्या शिक्क्यामुळे ग्राहक टियागो घ्यावी का नाही, असा विचार करतात. तरीही या सेगमेंटमधील वॅगन आर, स्टिंग रे, सेलेरियो आणि रिट्झ या कारच्या फीचर, स्टाइल, सेफ्टी, मायलेज आदींबाबत टियागो ही सरस कार आहे, असे वाहन तज्ज्ञ विनायक भिडे यांनी सांगितले. साडेचार ते पाच लाख रुपयांचे बजेट असणाऱ्यांनी मारुतीच्या कारबरोबर टियागोची टेस्ट ड्राइव्ह नक्की घ्यावी आणि त्यानंतरच आपला निर्णय घ्यावा.