13 July 2020

News Flash

टॉप गीअर : बजाज सीटी १००

कंपनीने बॉक्सरची विक्री भारतात बंद केल्यावर सीटी १०० सुमारे २००३-०४ मध्ये लाँच केली.

बजाज ऑटोने एंट्रीलेव्हल मोटारसायकल सेगमेंटमध्ये आपले स्थान सुधारण्यासाठी गेल्या दशकभराहून अधिक कालावधीत प्रयत्न केले आहेत. यात बॉक्सर, सीटी १००, प्लॅटिना, डिस्कव्हर १०० आदी मोटारसायकल समाविष्ट आहेत. कम्युटर सेगमेंटमधील सर्वात खालच्या पातळीवरील मोटारसायकल म्हणून सीटी १०० मोटारसायकल गणली जाते.

कंपनीने बॉक्सरची विक्री भारतात बंद केल्यावर सीटी १०० सुमारे २००३-०४ मध्ये लाँच केली. मात्र २००६ मध्ये पुन्हा या मोटारसायकलची विक्री थांबविण्यात आली होती. अखेरी, २०१५ मध्ये पुन्हा सीटी १०० भारतात लाँच केली. सीटी १०० लाँच करण्याआधी बेसिक कम्युटर मोटारसायकलमध्ये मेटलचा वापर अधिक केला होता. तसेच, गोल आकारा हेडलॅम्प होते. त्यामुळेच सीटी १०० लाँच करताना बजेटचा विचार करीत असलेल्या ग्राहकांना अधिकाधिक चांगली व आकर्षक रचना असलेली मोटारसायकल देण्याचा विचार बजाज ऑटोने केला. बॉक्सरच्या तुलनेत सीटी १००ची रचना विशेष आकर्षक ठरली. सीटी १००चा पुढील लुक हा कम्युटर सेगमेंटमधील प्रीमियम मोटारसायकलसारखाच दिसतो. व्ही शेप डिझाइनच्या हेडलॅम्प काउलमुळे हा फरक जाणवतो. मोटारसायकलच्या टाकीचा आकार फार मोठा नाही आणि मोठय़ा खुबीने रचना केल्याचे जाणवते. त्यावरील आकर्षक ग्राफिक्स आपल्यावर छाप सोडतात. हेडलॅम्प कन्सोलमध्ये स्पीडोमीटर, फ्युएल गॅग दिला आहे. मोटारसायकलचे इंडिकेट क्लिस्टर क्लीअर पद्धतीचे नाही. वास्तविक पाहता देण्याची गरज होती. मोटारसायकल मागील बाजूस आकर्षक दिसण्यासाठी ग्रॅबरेलही मेटॅलिक दिले आहे. बेसिक कम्युटरमध्ये अलॉय व्हीलचा पर्याय दिला जात नाही. मात्र सीटी १०० अलॉय व्हील पर्यायाबरोबर इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये उपलब्ध केली आहे. सीट मोठे व आकाराने जाड असून, आरामदायी आहे. मोटारसायकलला पुढील चाकास टेलिस्कोपिक व मागील चाकास हाड्रॉलिक स्प्रिंग इन स्प्रिंग सस्पेन्शन बसविण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागांतील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन दिलेली सस्पेन्शन योग्य वाटतात. मोटारसायकलमध्ये ब्लॅक कोटींगचा केलेला वापर मोटारसायकला लुक वाढविणारा आहे. एक्झॉस्ट हा पूर्ण काळ्या कोटिंगमध्ये असून, त्यावर क्रोमाफिनिशिंगचा मफलर दिला आहे.

मोटारसायकलला सिंगल सिलिंडरचे ८.१ बीएचपी असणारे १०० सीसीचे इंजिन बसविले आहे. संपूर्ण बजाज ऑटोच्या मोटारसायकल फॅमिलीत डीटीएसआय इंजिन नसलेली ही मोटारसायकल आहे. कंपनीने ताशी कमाल वेग ९० कि.मी. दिला आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत तो यापुढेही जाऊ  शकतो. मोटारसायकल सातत्याने अतिउच्च या वेगाने चालविल्यास इंजिन व्हायब्रेट होते, असा अनुभव आहे. हाच वेग ताशी ४० ते ५० कि.मी. राखल्यास इंजिनाची कामगिरी उत्तम राहते. कमी स्पीडने वाहन चालविल्यास मायलेज चांगले मिळते. या मोटारसायकलचे मायलेज ९० कि.मी. मिळते. पण रस्त्यावरील परिस्थिती, चालविण्याची सवय यावरही हे अवलंबून आहे.

ग्रामीण व निमशहरी ग्राहक हा या मोटारसायकलचा उपभोक्ता असल्याने मोटारसायकलचा देखभाल खर्च कमीतकमी कसा राहील यावर भर दिला आहे. देशातील सर्वात स्वस्त अशी मोटारसायकल म्हणायला हरकत नाही. मर्यादित बजेट असणाऱ्यांनी ही मोटारसायकल चालवून मग खरेदीचा निर्णय घ्यावा. या सेगमेंमध्ये हीरोमोटोकॉर्प एचएफ, टीव्हीएस स्पोर्टदेखील आहे.

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 2:05 am

Web Title: bajaj ct 100 bajaj bikes
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 ‘कार’ण  की..!
3 टॉप गीअर : टीव्हीएस स्टार सिटी प्लस
Just Now!
X