मला माझ्या बाबांसाठी कार घ्यायची आहे. माझे बजेट ३ ते ४ लाख रुपये आहे. या गाडीचा वापर अगदीच कमी असेल. त्यामुळे कोणती कार घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीतल कऱ्हाड

तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर मारुतीची अल्टो के१० योग्य राहील. शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला रेनॉ क्विड किंवा ह्युंदाई इऑन घेऊ शकता. या दोन्ही कार चांगल्या आहेत.

माझे बजेट १२ लाख आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये कोणती गाडी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा.

प्रमोदसिंग पाटील

कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्ही नक्कीच उत्तम क्वालिटी असलेली ुंदाई क्रेटा घ्यावी. तिची सव्‍‌र्हिस उत्तम आहे आणि कन्फर्ट इतर कुठल्याही एसयूव्हीपेक्षा उत्तम आहे.

मी दोन पायांनी अपंग असून, मला कार चालविता येईल का? माझे बजेट तीन ते चार लाख रुपये आहे. मी ग्रामीण भागातील आहे. माझा मासिक प्रवास कमी आहे. कृपया माझ्यासाठी योग्य असणारी कार सुचवा

सुभाष कोटकर, हिंगोली

सर, कुठलीही कार, रिक्षाला कमीत कमी एक पाय वापरावाच लागतो. जरी अ‍ॅटो गिअर गाडी घेतली तरीसुद्धा एक पाय आवश्यक असतो. तुम्हाला स्कूटर सोयीची राहील.

मला ड्रायव्हिंग शिकायचे आहे. शिकण्यासाठी कोणती कार घ्यावी? माझे बजेट एक ते दीड लाख रुपये आहे. कोणती कार घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा.

मयूर कुलकर्णी

तुम्ही वॅगन आर घेणे उत्तम ठरेल. त्यात तुम्हाला योग्य अंदाज येईल आणि चालवायला सोपी अशी ही गाडी आहे. दीड लाखात तुम्हाला ७ ते ८ वर्षे वापरलेली मिळू शकेल.

माझ्याकडे ह्युदाई आय१० इरा मॉडेल २००९ पासून आहे. ४० हजार ५०० किमीचे रनिंग झाले आहे. टायर, बॅटरी ९ हजार किमीनंतर चेंज केले आहे. कारची कुठलीही समस्या नाही. तुमच्या मते ती कार विकून नवीन घ्यावी का? का तीच ठेवावी? कृपया मार्गदर्शन करावे.

नरेंद्र पाटील, नाशिक

तुमचे रनिंग कमी असल्याने तुम्ही आहे तीच गाडी आणखी तीन वर्षे वापरू शकता. सेफ्टी फिचर हवी असतील तर तुम्ही नवीन गाडीचा विचार करावा.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car buying guidance car advice
First published on: 13-10-2017 at 00:12 IST