या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* मी नवखा ड्रायव्हर असून मला गाडी घ्यायची आहे. माझे बजेट पाच लाख रुपये आहे. सुरक्षा, कम्फर्ट, कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेज, एवढी सारी वैशिष्टय़े असलेली गाडी मला हवी आहे. मी क्विड आणि स्विफ्ट एलएक्सआय या गाडय़ांचा विचार करतो आहे, तुम्ही काय सुचवाल?

अभिनय कुलकर्णी

तुमचे बजेट ५ लाख आहे, त्यात टॉप मॉडेल घ्यायचे म्हणजे तुम्हाला अल्टो के१० किंवा रेनॉ क्विड घ्यावी, त्यात आरएक्सटी हे मॉडेल टॉप असून सर्व सेफ्टी फीचर्स त्यात आहेत

 

* मी टाटा टीएगो कार घेण्याचा विचार करत आहे. मला ही कार पुणे आणि गावी वापरायची आहे. तरी ही कार कशी आहेतिच्याबद्दल सविस्तर माहिती द्या. कारची वैशिष्टय़े आणि त्यातील त्रुटी हे दोन्ही सांगा.

प्रशांत घाडगे, बारामती

पेट्रोल मॉडेलचे थोडे मायलेज कमी आहे एवढीच समस्या आणि डिझेल मॉडेलला चांगले मायलेज असून तिची ताकद जरा कमी पडते; पण हायवेला काही प्रॉब्लेम येत नाही. ही गाडी सर्वोत्तम आहे. कमीत कमी किमतीत ही एक वजनदार आणि स्टर्डी गाडी आहे.

 

* मी मारुती आर्टगिा घेण्याचे ठरवले आहे, त्या गाडीबद्दल सांगा.

रवींद्र वंजारी

मारुती आर्टगिा ही चांगली गाडी आहे; पण ती फार महाग आहे; तुम्ही तिच्यापेक्षा चांगली असलेली रेनॉ लॉजी किंवा होंडा बीआर व्ही घ्या. या दोन्ही गाडय़ांचा दर्जा जास्त चांगला आहे.

 

* सर माझे रोजचे रिनग ६० किमी आहे. मला छोटी गाडी हवी आहे, हॅचबॅक, तर मी कोणती गाडी घेऊ?

वैभव इथापे

तुमचे रिनग जर सिटीमध्ये मुंबई किंवा पुण्यात असेल तर तुम्ही सीएनजी गाडी घ्यावी. त्यात तुम्ही सीएनजी सलेरिओ घ्यावी ही खूप स्मूथ आहे आणि सíव्हसला सोपी आहे. बाहेर हायवेवर जास्त ड्रायिव्हग होत असेल तर मात्र तुम्ही डिझेल टियागो किंवा नवीन पुण्टो प्युअर घ्यावी.

 

* मला गाडी घ्यायची असून माझे मासिक ड्रायिव्हग ३०० ते ४०० किमी आहे. माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. बजेटची काही अडचण नाही. आम्ही दोघेही गाडी शिकलेलो आहोत. फक्त गाडी कोणती घ्यावी याबाबत संभ्रम आहे. माझ्या मनात स्विफ्ट आहे. तुम्ही मार्ग सुचवा.

स्वप्निल सोनवणे

हो तुम्ही स्विफ्ट किंवा बलेनो घेऊ शकता. दोन्ही गाडय़ा मायलेज आणि मेन्टेनन्सच्या दृष्टीने चांगल्या असून लाइफ लाँग आहेत. रिसेल व्हॅल्यूही उत्तम मिळते. वापर कमी असल्यास नेहमी मारुतीच्या गाडय़ा योग्य ठरतात.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta which car to buy
First published on: 13-01-2017 at 00:16 IST