scorecardresearch

Premium

Asian Games 2023: गोल्डन गर्ल्स! नेमबाजीत भारताच्या मुलींनी फडकवला झेंडा, कोण आहेत मनू भाकर, ईशा आणि रिदम सांगवान?

Asian Games 2023: भारताच्या लेकींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले. कसा आहे त्यांचा प्रवास जाणून घेऊ या.

India's daughters hoisted the flag in shooting won gold know who are Manu Bhaker Isha and Rhythm Sangwan
भारताच्या लेकींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले. सौजन्य- (ट्वीटर)

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चार पदके जिंकली आहेत. बुधवारी भारताच्या मुलींनी नेमबाजी स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्या महिला संघाने २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या मुलींनी चीनचा तीन गुणांनी पराभव केला.

मनू भाकरने दोन गुणांच्या आघाडीसह पहिल्या राउंडला सुरुवात केली आणि जसा जसे राउंड पुढे जात असताना ती तीन गुणांपर्यंत वाढवली. त्यानंतर ईशा आणि रिदमने भारताची आघाडी कायम ठेवत देशासाठी सुवर्ण जिंकले. कोण आहेत मनू, ईशा आणि रिदम? त्यांचा इतिहास काय आहे… चला जाणून घेऊया.

India vs South Korea Hockey: India defeated Korea 5-3 made it to the finals assured of at least a silver medal
IND vs S. Korea Hockey: हॉकीत मेडल पक्कं! भारताने कोरियावर ५-३ असा शानदार विजय मिळवत थेट अंतिम फेरीत मारली धडक
NEP vs IND: Sai Kishore in tears during national anthem in debut match Dinesh Karthik makes suggestive remarks Said You are doing amazing
NEP vs IND: डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना साई किशोरला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने केले सूचक वक्तव्य; म्हणाला, “तुम्ही अप्रतिम…”
Asian Games 2023: India's Anant's Silver Performance Another medal for India in shooting a silver medal in the men's skeet event
Asian Games 2023: भारताच्या अनंतची रुपेरी कामगिरी! नेमबाजीत भारताला आणखी एक पदक, पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत जिंकले रौप्य पदक
IND vs AUS: Irfan Pathan's statement said If I were Sanju Samson I would be very disappointed
Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”

मनू भाकरला बॉक्सर बनायचे होते, पण डोळ्याच्या दुखापतीमुळे तिने नेमबाजीत करिअर केले

तरुण वयात मनू भाकर रँकिंगद्वारे भारताची नेमबाजी स्टार बनली. भारताचे हरियाणा राज्य बॉक्सर आणि कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध आहे, पण मनूने या ठिकाणाला नेमबाजीच्या माध्यमातून वेगळी ओळख दिली. हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला. याशिवाय तिने ‘थांग ता’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला आणि राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. मनूला बॉक्सर बनायचे होते, पण डोळ्याच्या दुखापतीमुळे बॉक्सिंग सोडले.

वयाच्या १४ व्या वर्षी मनूची आवड नेमबाजीकडे वळली. रिओ ऑलिम्पिक २०१६ नुकतेच संपले होते. त्यानंतर आठवडाभरात त्याने वडील राम किशन भाकर यांना शूटिंग पिस्तूल आणण्यास सांगितले. या निर्णयामुळे मनू भाकर भारताची स्टार नेमबाज बनली. २०१७च्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये, मनूने ऑलिम्पियन आणि माजी जागतिक नंबर वन हीना सिद्धूचा पराभव केला आणि २४२.३ गुणांसह नवीन विक्रम प्रस्थापित केला. ती राष्ट्रीय चॅम्पियन बनली आणि तिने मागे वळून पाहिले नाही. ऑगस्ट २०२० मध्ये, मनू भाकर यांना व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनू भाकर यांना हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी जून २०२२ मध्ये पंचकुलातील इंद्रधनुष सभागृहात भीम पुरस्काराने सन्मानित केले होते.

इव्हेंटगोल्डरौप्यकांस्य
विश्वचषक
युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा
ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप
कॉमनवेल्थ गेम्स
आशियाई खेळ
एकूण१५

वयाच्या नवव्या वर्षापासून शिकतेय ईशा, वयाच्या १८व्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

ईशा सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. गेल्या काही वर्षांत तिने शूटिंगमध्ये चांगले नाव कमावले आहे. ईशाचे वडील सचिन सिंग हे मोटरस्पोर्ट्समध्ये नॅशनल रॅली चॅम्पियन राहिले आहेत. म्हणून, त्याला त्याच्या वडिलांकडून अॅथलीटचे गुण वारशाने मिळाले. ईशा फक्त १८ वर्षांची आहे आणि तिने वयाच्या नऊव्या वर्षी शूटिंगचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. २०१४ मध्ये ईशाने पहिल्यांदा बंदूक हातात घेतली होती. २०१८ मध्ये त्याने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी ईशाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. तसेच, ईशाने युथ, ज्युनियर आणि सीनियर प्रकारात तीन सुवर्णपदके जिंकली. “पिस्तूलच्या गोळीचा आवाज तिला संगीतापेक्षा कमी वाटत नाही,” असे ईशा सांगते.

हेही वाचा: IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

ईशा तेलंगणामध्ये अशा ठिकाणी राहत होती जिथे जवळपास कोणतीही शूटिंग रेंज नव्हती, त्यामुळे तिला ट्रेनिंगमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. प्रशिक्षणासाठी तिला घरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या गचिबोवली स्टेडियममध्ये जावे लागले. इथपर्यंत पोहोचून ईशा मॅन्युअल रेंजवर सराव करायची. प्रशिक्षणाबरोबरच ईशाला अभ्यास आणि प्रवासही करावा लागला. एवढ्या लहान वयात इतर मुलं आयुष्याचा आनंद लुटत असताना ईशा स्वतःला अडचणींसाठी तयार करत होती. इतर गोष्टींवरून लक्ष हटवून शूटिंगवर लक्ष केंद्रित करणे ईशासाठी सोपे नव्हते. मात्र, अर्जुनप्रमाणे तीही आपल्या लक्ष्यावर केंद्रित राहिली.

ईशाला या ठिकाणी नेण्यासाठी तिच्या वडिलांनाही मोटार ड्रायव्हिंग करिअरचा त्याग करावा लागला. तिच्या वडिलांसोबतच ईशाच्या आईनेही तिच्यासाठी खूप त्याग केला. आता ईशाने त्या दोघांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. चार वर्षांच्या मेहनतीनंतर ती राष्ट्रीय विजेती ठरली आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे. भारत सरकारने त्यांना २०२० मध्ये पंतप्रधान बाल पुरस्काराने सन्मानित केले.

टूर्नामेंटपदकस्पर्धा
२०२३ बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपसुवर्ण१० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ
२०२३ बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपसुवर्ण२५ मीटर पिस्तूल संघ
२०२२ कैरो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसुवर्ण२५ मी पिस्तूल
२०२२ कैरो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसुवर्ण१० मीटर एअर पिस्तूल टीम
२०२२ कैरो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसुवर्ण१० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ
२०२१ लिमा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपरौप्य१० मीटर एअर पिस्तूल
२०२२ कैरो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपकांस्य२५ मीटर पिस्तूल संघ

वडिलांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पाहून रिदमने नेमबाजीला सुरुवात केली, त्याचे नाव आता रोशन आहे, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे उद्दिष्ट आहे

पोलीस खात्यात तैनात असलेले वडील नरेंद्र सांगवान यांचा गणवेश आणि सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पाहून प्रभावित होऊन शूटिंगला उतरलेल्या मेहरा गावातील रिदम सांगवानचा निर्णय योग्य ठरला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने देशाचा गौरव वाढवला आहे. आतापर्यंत तिने नेमबाजी विश्वचषकासह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १० सुवर्णपदके जिंकली आहेत. मेहदा येथील रहिवाशी रिदमचे वडील नरेंद्र सांगवान हरियाणा पोलिसात डीएसपी पदावर आहेत.

हेही वाचा: IND vs AUS: “तुम्ही फोनही केला नाही…”, ‘कमिटमेंट’च्या प्रश्नावर अमित मिश्रा रोहित शर्माला असं का म्हणाले? सराव दरम्यानचा Video व्हायरल

वडील नरेंद्रच्या म्हणण्यानुसार, रिदमने २०१७ मध्ये अनेकदा सर्व्हिस रिव्हॉल्व्हर वापरण्याचा हट्ट धरला, परंतु प्रत्येक वेळी तिला तिचे वडील समजवायचे. यानंतरही रिदमचा आग्रह कायम राहिल्याने त्यांनी तिला प्रशिक्षणासाठी शूटिंग रेंजवर पाठवण्यास सुरुवात केली. रिदमचे प्रशिक्षण आणि कठोर परिश्रम लवकरच सकारात्मक परिणाम दर्शवू लागले. पिस्तुल नेमबाजीची आवड पूर्ण करत रिदमने कनिष्ठ स्तरावर चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली. यानंतर रिदमने वरिष्ठ गटातही पदके जिंकण्यास सुरुवात केली. वडील नरेंद्र सांगवान यांनी सांगितले की, “मुलगी रिदमचे भविष्यात भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय आहे.” तिने सांगितले की, “रिदमने २०१७ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता.”

वडील नरेंद्र सांगवान आपल्या ड्युटीमुळे व्यस्त होते आणि त्यामुळे रिदमची आई आधी तिच्याबरोबर ट्रेनिंगसाठी जायची आणि त्यानंतर ती टूर्नामेंटला जायला लागली. नरेंद्र सांगवान यांनी सांगितले की, जेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या मुलीबरोबरगेली तेव्हा वडील काळूराम आणि त्यांचा मुलगा घरी एकटेच होते. रिदम सांगवान अभ्यासाबरोबरच खेळातही हुशार आहे. रिदमची मोठी बहीण जेसिका एमबीबीएस करत आहे. रिदमचा भाऊ एकलव्य हाही शाळेचा विद्यार्थी आहे.

इव्हेंटसुवर्णरौप्यकांस्य
ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप
ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप
ISSF विश्वचषक
ISSF कनिष्ठ विश्वचषक
आशियाई खेळ
एकूण१०

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2023 golden indian girls flag in shooting who are manu bhakar esha and ridham sangwan avw

First published on: 27-09-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×