जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थांच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो. कोथिंबिरीच्या देठांचा उपयोग भाजीच्या रशासाठी करता येतो. याला पांढरी जांभळसर रंगाची छत्रीच्या आकाराची गुच्छामध्ये फुले येतात. कालांतराने त्याचे रूपांतर फळामध्ये होते. यालाच धणे असे म्हणतात. या धण्यांचा उपयोग त्याला असणाऱ्या सुगंध व चवीमुळे गरम मसाला करण्यासाठी होतो. तसेच यापासून धण्याची डाळही बनविता येते. मराठीत कोथिंबीर, इंग्रजीमध्ये कोरिएन्डर तर हिंदीमध्ये हरा धनिया तर शास्त्रीय भाषेमध्ये कोरिएन्ड्रम सॅटिव्हम या नावाने ओळखली जाते. कोथिंबीर ही वनस्पती अंबेलिफिरी या कुळातील आहे.

आणखी वाचा : WPL 2023 DC vs RCB: कोण आहे तारा नॉरिस? जिने पहिल्याच सामन्यात आरसीबीच्या पाच फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता, घ्या जाणून

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

औषधी गुणधर्म

कोथिंबीर शीत गुणात्मक, अग्नीदीपक पाचक, तृष्णाशामक मूत्रल आहे. तसेच तिच्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबिरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो.

उपयोग

रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबिरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुब्बारा धरणे, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत. रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८ पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते. डोळ्यांची आग होणे, तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणे. डोळे कोरडे होणे, डोळे क्षीण होणे अशा विविध डोळ्यांच्या विकारावर कोथिंबीर उपयोगी आहे. कोथिंबिरीचा ताजा रस काढून त्यात ४-५ चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा व ते पाणी डोळ्यात २-३ थेंब घालावे.

आणखी वाचा : international womens day 2023 यशस्विनी : भाजीविक्रेती ते प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ; डॉ. विजयालक्ष्मी देशमाने यांचा थक्क करणारा प्रवास

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढविण्यासाठी २ चमचे धणे व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने भूकसुद्धा वाढते. अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा यामुळे जुलाब थांबतात. आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. स्थूलता कमी करण्यासाठी एक चमचा धणे, एक चमचा आवळा पावडर, अर्धा इंच आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.

आणखी वाचा : नागालँडच्या राजसत्तेत ‘कारभारणींची एंट्री’, ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन महिला आमदारांचा विजय

हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे. गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटीचा त्रास होतो. अशा वेळी धणे पूड एक चमचा व १० ग्रॅम खडीसाखर हे पाण्यामध्ये मिसळून ते पाणी थोड्या थोड्या अंतराने घोट घोट पीत राहावे. धणे सुगंधी, दीपक, पाचक, मुखशुद्धीकारक असल्यामुळे बडीशोपमध्ये मिसळून जेवणानंतर खावेत. यामुळे मुखदुर्गंधी दूर होते व पोटातील गॅस कमी होतो. मूत्र प्रवृत्ती होत नसेल व लघवीला आग होत असेल तर अशा वेळी ४ चमचे धणे रात्री ८ ग्लास पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळावे. थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर पीत राहावे. लघवीची जळजळ कमी होऊन मूत्रप्रवृत्ती वाढते.

आणखी वाचा : international women day 2023 कपडे आणि भूमिका या बाबत कधीच तडजोड केली नाही! – अभिनेत्री यामी गौतम धर

खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धण्याचा उपयोग केला जातो. धणेपूड, सुंठ व पिंपळी चूर्ण समप्रमाणात घेऊन मधातून सकाळ संध्याकाळ चाटण करावे असे केल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नष्ट होतो.

सावधानता
अनेक वेळा धण्याला पटकन कीड लागते. अशा वेळी बाजारातून आणताना कमी प्रमाणात धणे आणून त्याचा वेळीच वापर करावा. कोथिंबिरीचा स्वाद व औषधी उपयोग होण्यासाठी ताज्या कोथिंबिरीचा पदार्थात वापर करावा. फ्रीजमध्ये ठेवलेली अतिशिळी कोथिंबीर वापरू नये. तिचा स्वाद व औषधी गुणधर्म कमी होतात. ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून वापरावी. कोथिंबीर न धुता वापरल्यास आजारांची लागण होऊ शकते.

sharda.mahandule@gmail.com