लीना मोगरे, सेलिब्रिटी फिटनेस एक्सपर्ट आणि आहार तज्ञ
कोणत्याही क्षेत्रातले तुम्ही आद्य प्रवर्तक असता, तेव्हा तुमचं आयुष्य आणि त्यांतले अनुभव हेच तुमचे मेन्टॉरिंग करत असतात. माझं नेमकं तेच झालं. आता हेच बघा ना! मी फिटनेसच्या क्षेत्रातली पहिली स्त्री प्रशिक्षक अर्थात पर्सनल ट्रेनर! पहिली फिटनेस अकॅडमी सुरू करणारी स्त्री! गोल्ड जिम या आंतरराष्ट्रीय फिटनेस क्लबची भारतातली पहिली सीईओ! मुख्य म्हणजे स्वतःच्या नावाने जिम उघडणारी पहिली स्त्री उद्योजिका! ज्यावेळी या क्षेत्राचा व्यावसायिक विकास झाला नव्हता, तेव्हा मी अनपेक्षितपणे या क्षेत्राकडे वळले. त्यामुळे मला मेन्टॉरिंग करणारं मुळी कोणी नव्हतच तेव्हा! माझी मीच रस्ता शोधत गेले आणि यशाच्या शिखरावर पोहोचले.

आणखी वाचा : नोरा फतेही – अंधेरे से उजाले की और !

chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

मात्र या काळांत वेगवेगळ्या अनुभवांनी मला खूप शिकवलं, शहाणं केलं. माझी आवड आणि नेमका कल सर्वप्रथम ओळखला माझ्या आईने! तिने म्हटलं, तू आहार तज्ज्ञ का होत नाहीस? या क्षेत्राकडे सध्या तरी कोणीच वळत नाही. मी जुहूच्या एसएडीटी विद्यापीठात दाखल झाले. तिथे पदवी परीक्षेपूर्वीच सेमिनार होत असत. त्यामुळे छोट्या वर्गातून थेट मोठ्या प्रेक्षागृहात आहारविषयक व्याख्यानं द्यावी लागत. वक्तृत्व गुण आणि आत्मविश्वासाची पेरणी या सेमिनारमधून खऱ्या अर्थाने झाली. या व्याख्यानाची तयारी करताना लायब्ररी म्हणजे नेमकं काय, तिथे पुस्तकांची निवड कशी करायची, आपल्या विषयाशी संबंधित ज्ञान कसं ग्रहण करायचं याची मानसिक बैठक नेमकी तयार झाली. म्हणून म्हणते की जुहूचं एसएनडीटी कॉलेज हे माझं पहिलं मेन्टॉर!

आणखी वाचा : आडनावाचं रामायण

त्या काळात माझ्या आईने मला एका स्थानिक जिममध्ये घातलं. तिचा हेतू होता माझी उंची वाढवायचा! पण त्या दरम्यान एरोबिक्सने माझ्यावर गारुड केलं. मी नेहमीच नाविन्याच्या शोधात असते. मला ही अॅक्टिव्हिटी खूप आवडली. मुळांत शारीरिक व्यायाम माझा आवडता. पण तो व्यवसायात रूपांतरित होईल असं काही मला तेव्हा वाटलं नव्हतं. एकदा विठ्ठल कामत आमच्या घरी आले होते. त्यांनी विचारलं, “आत्ता कुठून आलीस तू?” म्हटलं, एरोबिक्स करून आलेय. ते म्हणाले,” अरे वा! मी क्लब सुरू करतोय. तिथे तू एरोबिक्सची प्रशिक्षक म्हणून ये.”मी म्हटलं, “अहो, मी काही रीतसर प्रशिक्षण घेतलेलं नाही एरोबिक्समध्ये”. ते म्हणाले,” ठीक आहे तू ये तर खरं.”मग मी एरोबिक्स या विषयावर खूप संशोधन केलं. ऑस्ट्रेलियात एरोबिक्स खूपच प्रचलित होतं तेव्हा! मी तिथल्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधून माहिती घेतली. माझे मित्र म्हणाले की आम्ही रीतसर एरोबिक्सचा कोर्स केलाय. मग आणखी अधिक संशोधन करून मी इथे भारतात एरोबिक्सची अकॅडमी सुरू करायचा निर्णय घेतला. तेव्हा काही जनसंपर्क अधिकारी असतात वगैरे ठाऊकच नव्हतं. त्यामुळे मी स्वतःच वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन माझ्या कामाचे लेख लिहून द्यायचे. मी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने त्या कोर्सचा अभ्यासक्रम तयार केला. डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ यांच पॅनल तयार केलं. नेमकं त्याचवेळी माझा ऑस्ट्रेलियातला एक मित्र इथे आला होता. मी त्याला म्हटलं, माझ्या पहिल्या बॅचला तू शिकव. मलाही शिकव. मित्र-मैत्रिणी आणि इतर विद्यार्थ्यांना घेऊन ही पहिली १० विद्यार्थ्यांची बॅच सुरू झाली. आजही ते मला धन्यवाद देतात की तुझ्यामुळे आम्ही फिटनेसकडे वळलो.

आणखी वाचा : मुलींना स्पर्श करण्यात कसलं सुख? तुमच्यासारख्या राक्षसांना तर…

हळूहळू मौखिक प्रसिद्धीतून अकॅडमीचा व्याप वाढत गेला. माझ्याकडे अनेक पालक तेव्हा यायचे. मुलाला व्यायामाची खूप आवड आहे पण जिम परवडत नाही असं म्हणायचे. अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी मी शिष्यवृत्ती सुरू केल्या. पुढे त्या मुलांना स्वतःचे जिम उघडायलाही मी मदत करू लागले. त्यातून त्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारत गेली. अचानक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गोल्ड जिम या व्यायामशाळेचे संचालक माझ्याकडे आले. त्यांना भारतात अनेक ठिकाणी शाखा सुरू करायच्या होत्या. त्यांनी मला गोल्ड जिमच्या परदेशातील कार्यालयात पाठवलं. तिथे वेगवेगळ्या जिम्स ना भेटी देऊन फिटनेसचं अत्याधुनिक तंत्र मी शिकले. भारतभर त्यावर आधारित १३ गोल्ड जिमच्या शाखा मी सुरू केल्या. गोल्ड जिमची सीईओ म्हणून मला आर्थिक व्यवहारापासून सर्व क्षेत्राचे ज्ञान मिळालं आणि मग वाटलं, आता आपल्या नावाला, ‘लीना मोगरे’ या नावाला एक वलय प्राप्त झालय! ज्ञान आणि अनुभवांचं पुरेसं संचित जमा झालेय. तेव्हा आता स्वतःच जीम सुरू करायला हवं. लीना मोगरे या स्वतःच्या नावाने सात जीम्स सुरू करणारी मी भारतातली पहिली उद्योजिका ठरले.

आणखी वाचा : फॅशनमधले अचाट तोडगे – ‘डीटॅचेबल’ बाह्या!

माझ्या सासू-सासर्‍यांनी या संपूर्ण काळात मला खूप पाठिंबा दिला. माझे सासरे बॉडी बिल्डर होते पूर्वी. ते तर माझ्या जिमच्या नावाचा टी-शर्ट घालून हौसेने मिरवत. माझ्या सासूबाई ओएनजीसी मध्ये उच्चपदस्थ. अत्यंत विनम्र. ही विनम्रता मी त्यांच्याकडून शिकले. पण माझ्या पतीने जेव्हा माझ्या व्यवसायात माझ्याबरोबर पाय टाकला तेव्हा मला हजार हत्तींचं बळ आलं. आता पर्सनल ट्रेनर म्हणून फिल्म जगतात माझं नाव होऊ लागलं. माधुरी दीक्षित माझी पहिली क्लाइंट! त्यानंतर बिपाशा बसू, करीना कपूर, कतरिना कैफ, रणबीर कपूर रांगच लागली म्हणाना! ही कलाकार मंडळी अत्यंत मेहनती आणि शिस्तप्रिय!

आणखी वाचा : विजया वसावे… नंदूरबारमधील ओळखपत्रधारक पहिली तृतीयपंथीय!

आता जिमचा व्याप वाढू लागला. मित्रांच्या मदतीने आम्ही विस्तार करू लागलो आणि एका विदारक अनुभवाने धडा शिकवला. मी सायबर गुन्ह्याच्या वेढ्यांत अडकले. माझ जिम बंद पडणार अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात येऊ लागल्या. त्याचा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला खरा!
‌पण मी आजही आशावादी आहे. नाविन्याच्या शोधयात्रेची पाईक आहे. मी हरणार नाही. कधीच! या अनुभवांतूनही सकारात्मक वृत्तीने मी झेप घेईन उज्ज्वल भवितव्याकडे!
madhuri.m.tamhane@gmail.com