“नेहमीच्या ट्रेनला नेहमीप्रमाणे उशीर झाला होता. त्यामुळे सेकंदागणिक फलाटावरची गर्दी वाढत गेली. आलेल्या ट्रेनमध्ये चढायला मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण ही ट्रेन चुकली तर दिवसभराचं गणित चुकणार होतं. पुढचा संपूर्ण दिवस मग धावपळ करावी लागते. ती दिवसभराची धावपळ टाळण्यासाठी ठरलेली ट्रेन पकडावीच लागते. पण ही ट्रेन वेळेत येईल तर शपथ ना…” रसिकाच्या मनात हे विचार सुरू होते. तेवढ्यात व्हॉट्सअॅपमधला ग्रुप खणाणला. “रसिका, ट्रेनमध्ये गर्दी आहे. आता डोंबिवलीला येईल ट्रेन, लागलीच चढ, पटकन पुढे ये. आम्ही जागा अडवून ठेवलीय.” तिने तो मेसेज वाचला आणि सुटकेचा निश्वास सोडला. पण आजूबाजूची गर्दी पाहता ट्रेनमध्ये चढायला मिळण्याची शाश्वती फार कमी होती. तिने फलाटावरून थोडंसं वाकून पाहिलं, ट्रेन येताना तिला दिसली. तिने लांबूनच ट्रेनला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. साडी खोचली. मोबाईल पर्समध्ये टाकला आणि पर्स एका काखेत घट्ट रोखून धरली. तेवढ्यात ट्रेन तिच्यासमोर आली. ट्रेन थांबायच्या आतच तिने ट्रेनमध्ये धाव घेतली आणि लागलीच पुढे जाऊन आपल्या ग्रुपच्या सानिध्यात सामील झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा दिवस मार्गी लागला. ठरलेली ट्रेन पकडली आणि घाटकोपरची सीट (बसायला) मिळाली. रसिका ट्रेनमध्ये चढली तरी तिच्यासोबतच्या अनेकजणी चढू शकल्या नाहीत. तिला उगीच वाटून गेलं, जरा एक मिनिट ट्रेन थांबली असती तर सगळ्याचजणी चढल्या असत्या की. प्रत्येकीची घाई असते, घरातलं आवरून यायचं, ट्रेनमधली गर्दी सहन करायची आणि ऑफिसमध्ये जाऊन बॉसची बोलणी खायची. या सर्व प्रयत्नात निदान ठरलेली ट्रेन तरी मिळावी. पण ट्रेन अवघे काही सेकंद थांबते आणि जितके प्रवासी ट्रेनमध्ये चढतील त्यांना घेऊन निघून जाते. त्या जाणाऱ्या ट्रेनकडे पाहत अनेक प्रवासी खंत करीत बसतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female local passengers celebrated rakshabandhan with local motonman and expecting more halt time on platform gift sgk
First published on: 30-08-2023 at 16:18 IST