परदेशात शिक्षण घेताना व्यक्तीला शैक्षणिक ज्ञानासह परिस्थितीनुसार विचार करणे, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे आणि संस्कृतीची देवाण-घेवाण करणे यांसाठी सक्षम बनविण्यात येते. या सर्व जीवनावश्यक गोष्टी शिकून झाल्यावर अनेक जण आपल्या मायदेशी परत येतात आणि त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा, त्यांच्या कौशल्यांचा वापर हा त्याच्या व्यवसायात करून भरपूर यश प्राप्त करतात. अशाच प्रकारे किर्लोस्कर कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर गौरी किर्लोस्कर यांनीदेखील परदेशात शिक्षण घेतले; परंतु नंतर त्या आपल्या वडिलांची कोटींची कंपनी सांभाळण्यासाठी मायदेशी भारतात परतल्या.

गौरी किर्लोस्कर या किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे चेअरमन व अतुल किर्लोस्कर यांच्या कन्या आहेत. गौरी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्सममधून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर गौरी यांनी यूएस पोस्ट ग्रॅज्युएशनमधील प्रख्यात कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून वित्त विषयातील बिजनेस विथ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर ऑफ सायन्स अशी पदवी मिळवली आहे. पुढे त्यांनी काही काळ मेरिल लिंच येथे गुंतवणूक बँकिंग [investment banking] विश्लेषक म्हणून काम केले. त्यानंतर गौरी पीअरसनच्या कॉर्पोरेट फायनान्स अॅण्ड स्ट्रॅटेजी ग्रुपमध्ये रुजू झाल्या.

हेही वाचा : ‘क्लॉडिया शेनबॉम’ पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनून घडवला इतिहास! कोण आहेत क्लॉडिया शेनबॉम जाणून घ्या

२०१० साली गौरी किर्लोस्कर भारतात परतल्या होत्या. आता गौरी किर्लोस्कर या किर्लोस्कर समूहाच्या आघाडीवर असून, पायाभूत सुविधा, गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान यासंबंधीच्या प्रकल्पांचे नेतृत्व करीत आहेत. इतकेच नव्हे, तर किर्लोस्कर समूहाच्या अंतर्गत अनेक कंपन्यांमध्ये त्या संचालक [डिरेक्टर] म्हणूनदेखील कार्यरत आहेत.

KOEL मध्ये काम करण्याआधी गौरी यांनी किर्लोस्कर समूहामधील किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड यांसारख्या इतर कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवला. एप्रिल २०११ पासून, गौरी यांनी किर्लोस्कर इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये बिगर कार्यकारी संचालक [non-executive director] म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : पॉडकास्टर, गोल्फर अन् भारतातील OpenAI मध्ये निवड झालेली पहिली व्यक्ती! जाणून घ्या कोण आहेत प्रज्ञा मिश्रा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीला भरभरून मिळालेल्या यशात गौरी किर्लोस्कर यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच कंपनी जवळपास १७,३०० कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून समजते.