अंडी हा प्रथिनांसाठीचा एक उत्तम स्रोत मानला जातो. अंडे खाल्ल्याने शरीराला तर फायदा होतोच. पण आपल्या केसांसाठीही अंडे अगदी उपयुक्त हे तुम्हाला माहीत आहे का ? केसांना अंडे लावल्याने केसांची चमक वाढते आणि ते मजबूतही होतात. थंडीमध्ये तर केसांना अंडी लावणे अगदी फायदेशीर ठरू शकते. थंडीमध्ये केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, डोक्याच्या त्वचेला खाज सुटणे, ती कोरडी होणे अशा अनेक समस्या भेडसावतात. केस निस्तेज, रुक्ष दिसू लागतात. अगदी जाहिरातीतल्यासारखे मऊ आणि चमकदार केस हवे असतील तर अंड्याचा हेअर पॅक लावणं हा चांगला उपाय आहे. अंड्यामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिनस ओमेगा-थ्री फॅटी ॲसिड, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलीला मासिकपाळीची माहिती कधी द्यावी?

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

चला तर मग जाणून घेऊया केसांवर अंड्याचा वापर कशाप्रकारे केला जाऊ शकतो आणि त्याचे काय फायदे आहेत-
शॅम्पू करायच्या आधी केसांवर अंडे लावा-
केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी शॅम्पूमध्ये अंडे मिक्स करून ते केसांना लावू शकता. यासाठी तुम्ही वापरत असलेला कोणताही शॅम्पू चालू शकतो. अंड्याचा पांढरा बलक कोंड्याच्या समस्येवर उपयुक्त समजला जातो. अंड्यातील पोषणमूल्यांमुळे आपल्या स्कॅल्पवर असलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळं शॅम्पूने केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना अंड्याचा पांढरा बलक लावून ठेवा. त्यानंतर अर्धा तासाने केस धुवावेत. यामुळे कोंड्याची समस्याही जाईल आणि केस लांबसडक आणि मजबूत होतील.

आणखी वाचा : आई व्हायचंय? तर प्रेग्नंसीसाठी ‘या’ दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्वाचं

अंडी आणि कोरफड ( Alovera)
अंडी आणि कोरफड म्हणजेच ॲलोव्हेरा जेल (Aloe vera Gel) एकत्र मिक्स करूनही तुम्ही ते केसांना लावू शकता. दोन अंड्यांमध्ये दोन चमचे ॲलोव्हेरा जेल घालून चांगलं मिक्स करा आणि हा ॲलोव्हेरा हेअर मास्क तुमच्या केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केसांना शांपू लावून केस धुवून टाका. या हेअर मास्कमुळे कोंडा तर जातोच पण केस अगदी मऊ होतात.

मेंदी (Mehendi) आणि अंडे
आपल्यापैकी बऱ्याचजणांना हा उपाय माहीत असेल. मेंदीला नॅचरल कंडिशनर मानलं जातं. मेंदीत अंडे मिसळून तो हेअर पॅक लावल्यास केस चमकदार होतात आणि कोंड्याची समस्याही दूर होते. मेंदीमध्ये अंडी. अर्थात तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल तर हा हेअर मास्क जरा जपूनच लावा.

अंडी आणि आवळा पावडर- (Amla)

तुमचे केस अगदी निस्तेज दिसत असतील आणि कोंड्याची समस्या भेडसावत असेल तर हा हेअर मास्क नक्की लावून बघा. अंडी फेटून त्यात आवळा पावडर घाला. ही पेस्ट केसांना लावा. त्यामुळे केसांना चांगलं पोषण मिळेल.

आणखी वाचा : दर अकराव्या मिनिटाला जगात एक स्त्रीहत्या! हत्या करणारे नातेवाईक किंवा जवळचेच- संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

ऑलिव्ह ऑईल आणि अंडे
डाएट करणाऱ्यांना ऑलिव्ह ऑईलचे फायदे माहिती आहेतच. पण केसांसाठीही ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. अंड्याचा पांढरा बलक आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून लावल्यास केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. त्याचबरोबर केस मजबूत आणि निरोगीही होतात. यामुळे स्कॅल्पमधल्या पीएचचं संतुलनही (PH Balance) होतं. दोन चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एका अंड्याचा पांढरा बलक आणि एक चमचा लिंबाचा रस किंवा पावडर घाला आणि ते चांगलं मिक्स करा. हे मिश्रण ब्रशने केसांना आणि स्कॅल्पला लावा. २० मिनिटांनंतर केस स्वच्छ धऊन टाका. यामुळे स्कॅल्पही स्वच्छ होईल आण कोंडाही निघून जाईल.

लिंबू (Lemon) आणि अंडे
लिंबूही केसांसाठी चांगलेच फायदेशीर असते हे आपल्याला माहिती आहे. दोन अंड्यांमधील पिवळा भाग घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस आणि मेंदी घाला. हे मिश्रण चांगलं मिक्स करा. हा पॅक केसांना २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस चांगले धुऊन टाका. यामुळे केसांची चांगली वाढ होते.

अंडे आणि ॲपल सायडर व्हिनेगर (Apple Sider Vinegar)
वजन कमी करण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांनी ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर केला असेल. पण केसांसाठीही ॲपल सायडर व्हिनेगर उपयुक्त आहे. कोंड्याचा त्रास होत असेल तर दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अंड्याचा पांढरा बलक मिक्स करा. हा पॅक केसांना २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुऊन टाका. यामुळे तुमचे केस अगदी मऊ आणि चमकदार दिसतील.

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

अंडी आणि मेथी ( Methi)
तुमचे केस जर खूप गळत असतील तर हा हेअर मास्क तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी एका अंड्यामध्ये दोन चमचे मेथी पावडर (पेस्ट) घालून त्याची पेस्ट करा आणि ती पेस्ट केसांना लावून ठेवा. या पेस्टमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑईलही घालू शकता. यामुळे केस गळणे थांबते आणि केस छान चमकदार होतात.

अंडी आणि दही (Curd)

अंड्याचा एखादा हेअर मास्क धुतल्यानंतरही केसांना अंड्याचा वास येत राहतो. हा वास घालवण्याचा हा उत्तम उपाय आहे. दह्यामध्ये अर्धा चमला लिंबाचा रस मिक्स करा आणि अंड्याचा हेअर मास्क धुतल्यानंतर हे केसांना अर्धा तास लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर केस धुऊन टाका.