डॉ. स्वाती हजारे
नियमित अंतराने, योग्य वेळा स्तनपान केले गेले तर अनेक संभाव्य धोक्यापासून बालकाला वाचविले जाऊ शकते.
सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामधील पहिल्या दिवशीचे ५ मिली ते १० मिली प्रति स्तनपानाचे प्रमाण ते वाढत जाऊन १०० मिली ते १५० मिली प्रति स्तनपान (Feeding) असे ८ – १० दिवसात होते. सुरुवातीचे इतके कमी प्रमाण असले तरी बाळाची जठर क्षमताही तेवढीच असते. जशी जशी ती वाढत जाते, तसे आईच्या दुधाचे प्रमाणही वाढत जाते.

आणखी वाचा : रजोनिवृत्ती आणि आहार

Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात
optical illusion
Optical Illusion : फोटोमध्ये कॅसेट्स दिसताहेत का? पण त्या कॅसेट्स नव्हे! फोटो एकदा नीट क्लिक करून पाहा
physical relationship after caesarean delivery
Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा
Loksabha Election 2024
“पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन द्या”; पुण्यात झळकले बॅनर्स

बाळाला दर दीड – दोन तासांनी पाजले पाहिजे. कधी कधी ही वेळ एक तासांनी पाजण्याइतकी कमी किंवा अडीच-तीन तासांइतकी जास्त असू शकते. शक्यतो दीड-दोन तासांमध्ये बाळाचे दूध पचून त्याला भूक लागते. तसेच प्रत्येक स्तनपानामध्ये बाळाचे दूधाचे प्रमाण कमी- जास्त होऊ शकते, त्यानुसारही यात फरक पडू शकतो. २४ तासांमध्ये साधारणत: ८ ते १२ वेळा स्तनपान होऊ शकते किंवा ते व्हायला हवे म्हणजे बाळास पुरेसे दूध मिळेल.

आणखी वाचा : साडी, लेहंग्यावर ‘क्रॉप टॉप’!

बाळाला भूक लागली हे कसे ओळखावे तर बाळ त्याची बोटे / हात तोंडाच्या दिशेने नेते किंवा तोंडात घालते. तसेच आपला चेहरा खांद्याच्या बाजूला नेतो (हे लक्षण स्तन शोधत असल्याचे असते). या काळात बाळ शांत असते. त्याच्या काही हालचाली चालू असतात. जर यावेळी दूधपाजले गेले तर बाळही दूध शांतपणे आणि पोटभर पिते. पण जर यामध्ये आपल्याकडून विलंब झाला तर बाळ रडायला लागते. मग बाळ व्यवस्थित स्तनपान करत नाहीत. त्यामुळे बाळ शांत असतानाच स्तनपान करावे.

आणखी वाचा : महिलांच्या नटण्या-मुरडण्यात ‘पुरुषांचा’ अडथळा

बाळ जेव्हा शांतपणे, एका तालात (म्हणजे दूध ओढणे नंतर ते गिळणे) दूध पित असेल, तसेच काही मिनिटांत झोपून जात असेल आणि स्वत:हून स्तन सोडत असेल (काही मिनिटांनंतर – साधरणत: १५ – ३० मिनिटे) तेव्हा बाळाने समाधानकारक स्तनपान केले आहे असे समजावे. बरेचदा बाळ दूध पित असताना पहिल्या पाच मिनिटात झोपून जाते आणि दूध पिण्याचे बंद करते. तर यामागे कारण आहे, एक प्रकारचे हार्मोन जे बाळाच्या जठरात दूध पोहचले की स्रवते, जे बाळाला झोपेबरोबर पोट भरल्याची भावना देते पण यात काही वेळातच बाळ पुन्हा जागे होऊन पुन्हा दूध पिण्यास सुरुवात करते. ही अवस्था पूर्णत: सामान्य असून ती बाळाला त्याच्या वाढीस मदतच करते.

आणखी वाचा : नातं कधीच शीळं होणार नाही, जर…

आता सर्वात खात्रीची तपासणी बालकाच्या दुग्धप्राशनाच्या प्रमाणाची म्हणजे बालकाचे – ‘सू’ चे म्हणजे मूत्रप्रवृत्ती आणि बालकांचे नियमित होणारे वजनवृद्धी तपासणी. बालकांच्या सुरुवातीच्या दिवसांत मूत्र (सू) च्या प्रमाणावरच बाळाचे स्तनपान प्रमाण ठरविले जाते. जर ‘सू’ व्यवस्थित असेल तर स्तनपानही व्यवस्थित आहे. हे समजते.

आणखी वाचा : अँटिऑक्सिडंटस् चा खजिना

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या दोन-तीन दिवसांत नवजात बालक काळ्या रंगाची मलप्रवृत्ती (शी) करते जो रंग तीन दिवसानंतर बदलून पिवळा होणे गरजेचे असते जर बालकास दिवसभरात आठ-दहा वेळा किंवा दर दीड – दोन तासांनी स्तनपान केले गेले तर हा मलाचा रंग लवकर बदलतो. म्हणजे आतड्यांच्या हालचाली वाढून ही काळ्या रंगाची मलप्रवृत्ती लवकर होते पण जर चौथ्या दिवशीही ही मलप्रवृत्ती काळ्या रंगाची चालू राहिली तर दुधाचे प्रमाण कमी आहे किंवा बाळ नीट स्तन धरत नसून दूध तेवढे बाळाच्या पोटात जात नाही हे ओळखावे. अशा वेळी त्वरीत बालरोगतज्ञ आणि स्तनपान विशेषज्ञ यांना संपर्क साधावा.

आणखी वाचा : “रवी सरांमुळे अरुंधती सापडली”

बाळ दिवसभर झोपणे – खेळणे हे शांतपणे चालले असेल, रोजची शी – सू नियमित असेल तर बाळाचे स्तनपान व्यवस्थित चालले आहे असे समजावे. परंतु जर रोजच्या काही सवयींपेक्षा काही वेगळे वागणे किंवा लक्षणे दिसून आली, रोजच्यापेक्षा जास्त वेळा बाळ रडत असेल किंवा स्तनपानाच्याही वेळा – प्रमाण कमी झाले असेल तर त्वरीत बालरोगतज्ञांना संपर्क साधावा. तसेच बालकांची विशिष्ट दिवसांगणिक वजनवृद्धी होत असते. पहिल्या तीन – पाच दिवसांमध्ये (जन्मानंतर) नैसर्गिकत: वजनात घट होत असते जी स्वाभाविक आहे. परंतु नंतर हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होते.

आणखी वाचा : लैंगिक अत्याचाराच्या खोट्या तक्रारींचे काय? 

साधारणत: पहिल्या पाच – दहा दिवसांत बालके त्यांच्या जन्माच्या वेळी असलेल्या वजनाला पोहचतात. परंतु जर तसे झाले नाही तर म्हणजे अपेक्षित वजनवाढ नसेल तर स्तनपानातून दूध कमी जात असण्याची शक्यता वाढते. अशावेळी त्वरीत स्त्रीरोगतज्ञ किंवा स्तनपानतज्ज्ञ यांना भेटून त्यावर उपचार सुरू करावेत. नवजात बालके, विशेषत: लवकर जन्मलेली, तसेच कमी वजनाची बालके असतात. त्यांच्या वजनाची तपासणी विशिष्ट अंतराने नियमितपणे केली गेली पाहिजे. यासर्वांमध्ये नियमित अंतराने, योग्य वेळा (८ – १२ वेळा) स्तनपान केले गेले तर अनेक संभाव्य धोक्यापासून बालकाला वाचविले जाऊ शकते.
drswatihajare@gmail.com