सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देते म्हणूनच परसबागेत सुगंधी फुलांची झाडे आवर्जून लावली जातात. अनेक वनस्पतींच्या फुलांत, पानांत, खोडांत, मुळात गंधकोष दडलेले असतात, हे आपल्याला प्राचीन काळापासून माहीत आहे. वनस्पतीपासून हा सुगंध वेगळा करून त्यापासून सुगंधी पाणी, तेल, अत्तरे बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. अत्तरातील खास भारतीय सुगंध मोगरा, गुलाब, वाळा, चंदन, केवडा, दवणा, मेंदी असे अनेक आहेत. त्यातील मोगरा, गुलाब तर परसबागेत असतातच. पण त्याचबरोबर घरातील मंगल कार्यात, पूजेसाठी, पाहुण्यांच्या स्वागतासाठी सहज वापरता येणारा दवणा, मरवा, वाळा सहज लावता येतात.

दवणाचे छोटे क्षूप असते. याच्या पाना, फुलांमध्ये सुगंधी द्रव्य असते. रानावनात भटकंती करताना खूप ठिकाणी रानदवणा आढळतो. पाने चुरगाळली असता सुगंध येतो.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’

देवपूजेसाठी आवर्जून लागणारी आणखी एक सुगंधी वनस्पती मरवा. मरव्याचे ही छोटे क्षूप असते. नाजूक सुगंधी पाने ही याची खासीयत. मरव्याची रोपं सावित्रीबाई फुले युनिव्‍‌र्हसिटीच्या पार्क्‍स अँड गार्डन रोपवाटिकेत मिळतात. छोट्या कुंडीत रोप लावता येते, ऊन आणि पाणी दोन्ही आवडते. मरव्याला नाजूक पांढऱ्या फुलांचे तुरे येतात, मधमाशांना ही फुले फार आवडतात. मरव्याच्या नाजूक काड्या मातीत खोचल्या तर नवीन रोपं तयार होतात, मुळातून नवीन फुटवे येतात, त्याची विरळणी करून नवीन रोपं करता येतात. ही सुगंधी भेट सगळ्यांनाच आवडते.

हेही वाचा… कामजिज्ञासा: मेनॉपॉजच्या काळात शरीरसंबंधांचा त्रास होतोय?

पूर्वी मरवा वेणीत गुंफत असत. याचे उल्लेख दोन गीतांमध्ये आढळतात. ‘चला सख्यांनो हलक्या हाती नखा नखावर रंग भरा गं, वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा गं’ अन् ‘शालू हिरवा पाचू नी मरवा, वेणी तिपेडी घाला’ आता तिपेडी वेणी नाही. त्यावर फुलांची वेणी नाही अन् मरवाही फारसा दिसत नाही. पण मरव्याचा सुगंध फार सुंदर असतो. रोप सहज रुजते. फारशी देखभाल लागत नाही. आपल्या हाताशी ही नैसर्गिक गंधकुपी जरूर असावी.

हेही वाचा… गृहिणीचे उत्पन्न आणि अपघात विमा भरपाई

गोकुळ अष्टमी, गणेश चतुर्थीला फुल बाजारात हमखास दिसतो केवडा. केवडा पाणी खाद्य पदार्थामध्ये, शाही बिर्याणीमध्ये वगैरे वापरले जाते. केवड्याचे एखादे रोप शोभेसाठी कुंडीत लावू शकतो, दणकट असल्याने फारशी देखभाल लागत नाही. जमिनीत मात्र आक्रमक रीत्या वाढते. त्यामुळे कुंडीतच लावावे. केवड्याची पानेही सुंदर दिसतात, कणीस मिळाले तर सोन्याहून पिवळे.

आपल्या नेहमीच्या वापरात असणारी सुगंधी वनस्पती वाळा. उन्हाळ्यात पाण्यात वाळ्याची जुडी लागतेच, सणावारात वाळ्याचे अत्तर अन् खसचे सरबतही लोकप्रिय आहे. वाळा आपल्या बागेत सहज लावता येतो. वाटिकेत रोपं मिळतात. कुंडीत, आडव्या क्रेटमध्ये, वाफ्यात सहज येतो. पाने नाजूक पात्यासारखी असतात. सुंदर दिसतात. मार्च-एप्रिलमध्ये पांढरे तुरे येतात. मग सुगंधी मुळे काढून वापरता येतात. उन्हाळा सुसह्य़ करण्यासाठी, मुळे काढून पुनरेपण व नवी रोपं करता येतात. उताराच्या जमिनीवर मातीची धूप थांबवण्यासाठी वापरतात. फार्म हाउस, गृहनिर्माण संस्था अगदी बाल्कनीत, कुंडीतही लावता येईल वाळा.