scorecardresearch

विभक्त पतीनं दुसर्‍या स्त्रीबरोबर राहणं क्रूरता नाही!

दिल्ली उच्च न्यायालयासमोर एका पती-पत्नीच्या आलेल्या झगड्यात असाच एक महत्त्वाचा निकाल देण्यात आला. केवळ घटस्फोटाचे प्रकरण सुरू असलेल्यांनीच नव्हे, तर इतरांनीही त्यातली निरीक्षणे समजून घ्यावीत अशीच.

divorced husband living another woman not cruelty judgement Delhi high court
विभक्त पतीनं दुसर्‍या स्त्रीबरोबर राहणं क्रूरता नाही! (छायाचित्र- फ्रीपिक)

घटस्फोटाची प्रकरणे अनेकदा गुंतागुंतीची असतात. पुष्कळदा पती-पत्नी आधी विभक्त राहण्यास सुरूवात करतात, एकमेकांच्या विरोधात न्यायालयात विविध प्रकरणे दाखल केली जातात आणि एकमेकांविरुद्धचा झगडा सुरू राहतो. त्यात विभक्त होण्यापूर्वीची वा नंतरची अपत्ये संबंधितांना असतील, तर गुंतागुंत वाढू शकते. घटस्फोटाच्या देशभरातील प्रकरणांमध्ये न्यायालयाने आजवर अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत आणि पुढील प्रकरणांमध्ये ते अत्यंत मार्गदर्शक ठरले आहेत. घटस्फोटाशी संबंधित खटल्यांच्या आणि निकालांच्या बाबतीत आपल्या मनात काही गृहितकं पक्की झालेली असतात, त्यांना अशा मार्गदर्शक प्रकरणांमधून धक्काही बसतो. दिल्ली उच्च न्यायालयासमोर एका पती-पत्नीच्या आलेल्या झगड्यात असाच एक महत्त्वाचा निकाल देण्यात आला. केवळ घटस्फोटाचे प्रकरण सुरू असलेल्यांनीच नव्हे, तर इतरांनीही त्यातली निरीक्षणे समजून घ्यावीत अशीच.

पती किंवा पत्नीला ज्या कारणास्तव घटस्फोट मागता येऊ शकतो त्याची विस्तृत यादी हिंदू विवाह कायद्यामध्ये देण्यात आली आहेत. त्या यादीतील ‘क्रूरता’ या कारणास्तव घटस्फोट मागितला जाण्याचे प्रमाण आपल्याकडे लक्षणीय आहे. विविध खटल्यांमधील निकालांनी क्रूरता या शब्दाची व्याप्ती वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. क्रूरतेमध्ये शारीरीक आणि मानसिक क्रूरतेचासुद्धा सामावेश केलेला आहे. तरीसुद्धा नवनवीन कृत्ये किंवा गोष्टी क्रूरता ठरु शकतात का? हा प्रश्न विविध न्यायालयांसमोर अनेकदा येतो.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

हेही वाचा… गौराई नाही गं अंगणी…?

अनेक वर्षांपासून पत्नीपासून विभक्त राहात असलेला पती दुसर्‍या स्त्रीबरोबर राहणे ही पत्नीप्रती क्रूरता आहे का?… असा एक नवीनच प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयासमोर उपस्थित झाला होता.

या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि घडलेल्या घटनादेखील महत्त्वाच्या आहेत. या प्रकरणात पती-पत्नीमध्ये लग्नानंतर लगेच खटके उडायला लागले. नंतर जेव्हा पत्नी गर्भवती राहिली, तेव्हा तिने माहेरी जाऊन गर्भपात करुन घेतला. सरतेशेवटी साधारण २००५ पासून पती-पत्नी विभक्त राहायला लागले. दरम्यानच्या काळात पती-पत्नीने एकमेकांविरोधात विविध न्यायालयीन प्रकरणे दाखल केली. पत्नीने सासरच्यांविरोधात ‘४९८-अ’चा गुन्हा दाखल केला, ज्यात सासरच्यांची निर्दोष सुटका झाली. पतीला पत्नीची एकंदर वागणूक क्रूरतेची असल्याच्या निष्कर्षास्तव न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. त्या निकालाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपीलात एवढ्या वर्षांत पहिल्यांदा पत्नीने पती दुसर्‍या महिलेसोबत राहत असून त्यांना दोन अपत्ये असल्याचा आरोप करुन ही स्वत:प्रती क्रूरता असल्याचे निवेदन केले. मात्र याबाबतीत कोणतीही विशिष्ट माहिती किंवा पुरावे पत्नीने सादर केले नाहीत.

हेही वाचा… आरोग्य पालकत्व: स्क्रीन टाइम आणि मेटॅबोलिक सिंड्रोम

दिल्ली उच्च न्यायालयाने या आरोपांबाबत निकाल देताना एक पाऊल पुढे जाऊन “केवळ वादाकरता जरी असे मानले, की घटस्फोट याचिका प्रलंबित असताना पती दुसर्‍या महिलेसोबत राहात असून त्याला अपत्ये आहेत, तरी २००५ पासून विभक्त राहात असल्याने, केवळ त्याच एका कारणास्तव पतीने क्रूरता केल्याचे म्हणता येणार नाही,” असे निरक्षण नोंदवले आणि अपील फेटाळून लावले.

क्रूरतेच्या कारणास्तव वैवाहिक याचिका आणि घटस्फोट यांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. पत्नीच्या क्रूरतेमुळे विभक्त झालेल्या पतीच्या आणि त्या पतीसह राहत असलेल्या महिला आणि त्या दोघांच्या अपत्यांकरतासुद्धा हा निकाल महत्त्वाचा आहे.

lokwomen.online@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2023 at 16:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×