सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि वाढता तणाव याचा परिणाम महिलांच्या गरोदरपणावर होताना दिसत आहे. आजकाल बहुतेक महिलांच्या गरोदरपणात काही ना काही अडचण असते, त्यामुळे डिलिव्हरी सिझेरियनने करावी लागते. सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे मोठे ऑपरेशन करून मुलाला जन्म देणे. जेव्हा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाला आणि आईला काही धोका असतो तेव्हा डॉक्टर सिझेरियन डिलिव्हरी करतात.

महिलांच्या डिलिव्हरीवेळी धोके अनेक प्रकारचे असू शकतात जसे की बाळाची स्थिती बरोबर नसणे, गर्भात बाळाचे डोके वर आणि पाय खाली असणे, बाळाची स्थिती वारंवार बदलणे, प्लासेंटा खाली असणे अशी समस्या असल्यास महिलांना सिझेरियन डिलिव्हरीची आवश्यकता असते. सिझेरियन डिलिव्हरीनंतर, स्त्रीचे शरीर सामान्य स्थितीत येण्यास बराच वेळ लागतो. नॉर्मल डिलिव्हरीनंतर जिथे स्त्री एक ते दीड महिन्यात शारीरिकदृष्ट्या सक्रिय होते, तिथे सिझेरियन प्रसूतीच्या रिकव्हरीसाठी थोडा जास्त वेळ लागतो.

( हे ही वाचा: मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा)

सिझेरियन डिलिव्हरीनंतर, कोणत्याही महिलेसाठी, शारीरिक संबंध ठेवण्याची घाई तिच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. सिझेरियन डिलिव्हरीच्या जवळपास ७ ते १० आठवड्यांपर्यंत, स्त्रीने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकांना प्रश्न असतो की, सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी स्त्री शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम असते. तर जाणून घेऊया सिझेरियन प्रसूतीनंतर स्त्रीने शारीरिक संबंध कधी ठेवावेत.

सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो

शेफाली त्यागी, मदरहूड शारजापूर हॉस्पिटलच्या कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी सांगितले की, सिझेरियन डिलीव्हरीमध्ये मुलाची प्रसूती योनीमार्गे होत नाही, तर ओटीपोटात आणि गर्भाशयात चीर टाकून केली जाते. सामान्य डिलिव्हरीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, बाळाची सुरक्षित प्रसूती करण्यासाठी सी-सेक्शन प्रसूती केली जाते.

सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी तुम्ही सेक्स करू शकता?

सी-सेक्शन डिलिव्हरीमध्ये, स्त्रीच्या प्रसूतीदरम्यान टाके टाकले जातात, जे योनिमार्गाच्या प्रसूतीपेक्षा बरे होण्यासाठी जास्त वेळ घेतात. सिझेरियन डिलिव्हरीनंतर सहा आठवड्यांनी स्त्री शारीरिक संबंध ठेवू शकते. मात्र, प्रत्येक महिलेचा रिकव्हरी वेळ हा वेगवेगळा असतो. काही महिलांची रिकव्हरी व्हायला वेळ लागतो. त्यामुळे त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. प्रसूतीनंतर, गर्भाशयाचा आकार बदलतो, जो सामान्य होण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे तुमचे शरीर शारीरिक संबंध बनवण्यास सक्षम झाले आहे की त्यासाठी अधिक वेळ लागेल याचा सल्ला तुम्ही डॉक्टरांकडून घेणे गरजेचे आहे.

( हे ही वाचा: यूरिक अॅसिड वाढल्यास शरीर देऊ लागते संकेत; गंभीर आजार होण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिझेरियन प्रसूतीनंतर लैंगिक संबंध ठेवणे कसे त्रासदायक ठरू शकते

सिझेरियन डिलिव्हरीनंतर लैंगिक संबंध ठेवणे वेदनादायक असू शकते. या दरम्यान, महिला बाळाला स्तनपान देते, ज्यामुळे योनीमध्ये जास्त कोरडेपणा असतो. नेचुरल लुब्रीकंटची कमतरता असल्यामुळे सेक्स करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सिझेरन डिलिव्हरीच्या ६ आठवड्यांनंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करावा.