१९१७ साली जन्म झालेल्या महाराणी सीतादेवी या त्या काळात अतिशय पुढारलेल्या विचारांच्या होत्या. सीतादेवींचे पहिले लग्न एमआर अप्पा राव बहादूर यांच्याशी झाले होते. मात्र, १९४३ साली मद्रास हॉर्स रेसमध्ये बडोद्याचे महाराज प्रतापसिंहराव गायकवाड यांना भेटताच सीता देवींच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. बडोद्याचे महाराज प्रतापसिंहराव गायकवाड हे त्याकाळी श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानावर होते.

महाराज प्रतापसिंहराव गायकवाड यांना पाहताच सीतादेवींवर त्यांची भुरळ पडली होती. इतकी की, सीतादेवींना महाराज प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याशी विवाह करायचा होता. मात्र, त्यांचे लग्न आधीच अप्पा राव बहादूर यांच्याशी झाले होते. या प्रसंगावर तोडगा काढण्यासाठी महाराजांच्या कायदेशीर सल्लागारांनी, सीतादेवींना घटस्फोट घेण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. सीतादेवींनी दिलेल्या सल्ल्यानुसार इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे पहिले लग्न संपुष्टात आणले आणि पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी महाराजा प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याशी लग्न केले.

Adoption Leave for women in india
Adoption Leave For Women : आसाममध्ये मूल दत्तक घेणाऱ्या आईसाठी १८० दिवसांची रजा मंजूर, पण केंद्राचा नियम काय सांगतो?
July 12th the world celebrates Malala Day in honour of Nobel Peace Prize recipient Malala Yousafzai
Malala Yousafzai: तालिबानी बंदूकधाऱ्याने डोक्यात झाडली गोळी अन् बदललं आयुष्य; जाणून घ्या ‘मलाला दिवसा’निमित्त प्रेरणादायी गोष्ट
Urine Infections
स्त्री आरोग्य: यूरिन इन्फेक्शन कशामुळे होतं ?
why should women buy health insurance in 30s check best health insurance for women
महिलांनो, वयाच्या तिशीत कोणता आरोग्य विमा काढावा? जाणून घ्या
Supreme Court's Big Alimony Order For Muslim Women
“पोटगी महिलांचा हक्क आहे, दान नाही”, मुस्लीम समाजातील महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Cultivating Wild Vegetables, Cultivating Wild Vegetables on terrace, kurdu, Moringa, terrace farming, wild vegetable farming on Terrace, chatura article,
कुंडीतला शेवगा आणि कर्टुलं…
ashadhi wari,
आवा चालली पंढरपुरा…
Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
husband not like his wife s relatives
समुपदेशन : बायकोचं माहेर का सलतंय?

लग्नानंतर हे गायकवाड दाम्पत्य मॉन्टे कार्लो येथे स्थलांतरित झाले. तिथे गेल्यानंतर सीतादेवींनी उच्चभ्रू समाजात आपले स्थान निर्माण केले.

हेही वाचा : महिलांच्या हाती सुरक्षेची दोरी! ‘या’ राज्यात आहेत ११.५ टक्के महिला पोलिस अधिकारी कार्यरत, पाहा

महाराणी सीतादेवी आणि महाराज गायकवाड यांचे अतिशय श्रीमंती राहणीमान होते. त्यांनी जंगी खरेदी आणि युनायटेड स्टेट्सच्या दोन सहलींवर तब्ब्ल ८३ कोटी रुपये खर्च केले होते. सीतादेवी प्रवास करताना कायम हजार साड्या सोबत ठेवत असत. इतकेच नाही तर प्रत्येक साडीला मॅचिंग असणाऱ्या चपलादेखील बरोबर असत. साड्या आणि चपलांसह अप्रतिम दागिन्यांचा संग्रह सोबत ठेवत असत.

महाराज गायकवाड यांच्याशी लग्न झाल्यानंतर सीतादेवींना बडोदा ट्रेजरीमधूनदेखील काही दागिने मिळाले होते. त्यातील काही दागिने हे मुघल काळातील होते, अशी माहिती क्रिस्टीज न्यू यॉर्कने म्हटल्याचे डीएनएच्या एका लेखावरून समजते. यापैकी एक सातपदरी मोत्याचा हार आणि ‘स्टार ऑफ द साउथ’ आणि ‘इंग्लिश ड्रेसडेन’ हिऱ्यांचा तीन पदरी हारदेखील होता. सीतादेवींकडे असणाऱ्या दागिन्यांपैकी अनेक दागिने नंतर मोनॅकोमध्ये विकले गेले; तर, सात पदरी मोत्याचा हार हा बडोदा रॉयल ट्रेझरीमध्येच ठेवण्यात आला होता.

१९५३ साली सीतादेवी यांना कार्टियर लंडनमधून खऱ्या, नैसर्गिक मोती आणि हिऱ्याचे ब्रेसलेट मिळाले होते, तर ब्रेसलेटसारखेच कानातले व्हॅन क्लीफ आणि अर्पल्सकडू मिळाले होते. सीतादेवींनी व्हॅन क्लीफ आणि अर्पल्सकडून स्वतःसाठी खास सोन्याचे जीभ साफ करणारे ‘टंग क्लिनर’ आणि माणकाचे [रुबी] सिगरेट होल्डर बनवून घेतले होते.

सीतादेवींकडे इमराल्ड [emerald] आणि हिऱ्याचे पैंजण होते, जे त्यांनी हॅरी विन्स्टन नावाच्या जवाहिऱ्याला विकले होते. विन्स्टनने त्या पैंजणांचे हिरे दुसऱ्या नेकलेसमध्ये बसवले जे नंतर विंडसरच्या डचेस वॉलिस सिम्पसनने विकत घेतले होते. सीतादेवीला अनेकदा “वॅलिस सिम्पसन ऑफ इंडिया” म्हणून संबोधले जायचे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका बॉल/कार्यक्रमादरम्यान सीतादेवी या डचेसना भेटल्यानंतर, सिम्पसनने घातलेला हार पाहून “ते दागिने माझ्या पायांवर अधिक सुंदर दिसायचे” असे म्हटले असल्याचे डीएनएच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिली ‘पॉवर ड्रेसिंग’ला नवी ओळख; सर्वत्र होते ‘अरमानी’ची चर्चा, पाहा

१९६९ साली एस्कॉट गोल्ड कपमध्ये, सीतादेवीने तिच्या उजव्या हातात तब्ब्ल ३० कॅरेटचे नीलम [sapphire] घातले होते आणि त्या दागिन्याला हात लावण्यासाठी सीतादेवी पाहुण्यांना आमंत्रित करीत होत्या.

परंतु, बडोद्याचे महाराज गायकवाड आणि त्यांची पत्नी सीतादेवींच्या ऐषोआराम आणि श्रीमंती राहणीमानामुळे महाराज बिनव्याजी कर्जात बुडू लागले व त्या जोडप्याला आर्थिक फटका बसू लागला होता. याचा परिणाम महाराज गायकवाड आणि सीतादेवींच्या आयुष्यावर, त्यांच्या नात्यावर होऊ लागला. अखेरीस दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सीतादेवी व महाराज प्रतापसिंहराव गायकवाड यांचा घटस्फोट झाला, असे डीएनएच्या एका लेखावरून समजते.