डॉ. शारदा महांडुळे

मोत्यांच्या दाण्याप्रमाणे दिसणारे मका हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे अन्नधान्य आहे. याचा उपयोग मानवी खाद्य आणि पशुखाद्य अशा दोन्हींसाठी केला जातो. मक्याला इंग्रजीमध्ये ‘मेज’ किंवा ‘इंडियन कॉर्न’, संस्कृतमध्ये ‘महायावनाल’, तर शास्त्रीय भाषेत ‘झिया मेझ’ (Zea mays) या नावाने ओळखले जाते. ते ‘पोएसी’ या कुळातील तृणधान्य आहे. सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये मक्याचा उगम झाला व तेथून तो जगभर पोहोचला. गुजरात व महाराष्ट्रामध्ये गरीब व आदिवासी लोकांचा मुख्य आहार मका आहे.

Kobi Sabzi Benefits What Changes In Body When You Eat Cabbage Once A week
दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे; एक वाटी भाजीत किती कॅलरीज दडल्यात पाहा
What causes teenage childrens behaviour strangely
इतिश्री : मुलं असं ‘कशामुळे’ वागतात?
health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
Womens Health Marina alternative to hysterectomy
स्त्री आरोग्य : गर्भाशय काढून टाकण्याला ‘मेरीना’चा पर्याय?
Valsad in the south, the tribal region in Gujarat
नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?
mumbai coconut prices marathi news, mumbai coconut rates marathi news
आवक घटल्याने शहाळी महाग
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’

मक्याचे रोप साधारणः तीन-चार हात उंच वाढते. ते दिसायला ज्वारीच्या रोपाप्रमाणे असते.

मक्याच्या रोपाच्या गाठीमधून नवा अंकुर फुटतो. त्या अंकुरामधूनच प्रत्येक रोपाला जास्तीत जास्त तीन कणसे लागतात. मक्याचे दाणे सर्व धान्यांमध्ये मोठे असतात. या दाण्यांचा रंग पिवळा असतो, तर काही दाणे लाल रंगाचे असतात. याचे पीक निघायला दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधी लागतो.

आरोग्यासाठी मक्याचे कोवळे दाणे सर्वात चांगले असतात. या दाण्यांपासून उसळ, सूप, वडे, कोशिंबीर, सॅलड करता येते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : मक्याचे दाणे मधुर, कडू, तुरट, रूक्ष, कफ-पित्तहारक, रुची उत्पन्न करणारे व शीत गुणधर्माचे आहेत. अति प्रमाणात मक्याचे दाणे खाल्ल्यास वातप्रकोप होतो.

आधुनिक शास्त्रानुसार : मक्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, ‘बी’ कॉम्प्लेस व ‘ई’ जीवनसत्त्व असते. त्याचबरोबर प्रथिने, मेद, आर्द्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व घटक विपुल प्रमाणात असतात.

उपयोग :

१) मक्यामध्ये असणाऱ्या ‘ई’ जीवनसत्त्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे कोवळे कणीस भाजून खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. ही कोवळी कणसे चवीला खूप स्वादिष्ट असतात.

२) मक्याच्या गोडसर चवीमुळे त्याला ‘स्वीट कॉर्न’ असेही म्हणतात. इतर सर्व धान्यांपेक्षा मक्यामध्ये नैसर्गिक शर्करा जास्त प्रमाण असते.

३) मलावष्टंभाचा त्रास असणाऱ्यांनी मक्याचे दाणे वाफवून खाल्ले असता त्याच्या सारक गुणधर्मामुळे आतड्यांची हालचाल वाढून शौचास साफ होते.

४) वाळलेल्या मक्याच्या दाण्याच्या उत्कृष्ट लाह्या बनतात. यालाच ‘पॉपकॉर्न’ असे म्हणतात. लाह्या करताना त्यातील कांजी जळून जाते. त्या खाल्ल्याने वजनामध्ये वाढ होत नाही.

५) स्थूल व्यक्तींना वजन कमी करायचे असेल, तर पॉपकॉर्न खावेत. यामुळे भूक शमली जाऊन वजन कमी होते.

६) मक्याच्या पिठापासून भाकरी बनविली जाते. ही भाकरी स्वादिष्ट असून, शरीरास पौष्टिक असते व खाल्ल्यानंतर ती सहजच पचते.

(७) मका दळून त्याचे पीठ बनवून ठेवावे. या पिठापासून रोटी, भाकरी, थालीपीठ, ढोकळे, वडे असे
पदार्थ बनवावे. फक्त भाकरी व रोटी खाताना मक्याच्या रूक्ष गुणाचा त्रास होऊ नये म्हणून त्यावर
साजूक तूप टाकावे.

८) मक्याच्या दाण्यांपासून सूप, सॅलड, भेळ, कोशिंबीर, मक्याचा चिवडा, वडे, उसळ असे विविध पदार्थ बनतात.

९) पळसाच्या पानावर मक्याच्या पिठापासून बनविलेली भाकरी अत्यंत गोड, स्वादिष्ट व पौष्टिक असते. या भाकरीलाच ‘पानगी’ असे म्हणतात. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी मक्क्यापासून भाकरी बनविली जाते.

१०) लहान मुलांची वाढ चांगली होण्यासाठी मक्याचे सूप, भेळ, उसळ, थालीपीठ अशा विविध पदार्थांची योजना त्यांच्या आहारामध्ये करावी.

११) दातांचे व हिरड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मक्याचे कणीस भाजून द्यावे. यामुळे हिरड्यांजवळील रक्तपुरवठा सुधारतो. मात्र कणीस खाल्ल्यानंतर दात स्वच्छ घासावेत.

सावधानता : मका पचण्यास जड असल्याने ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा व्यक्तींनी तो खावा. ज्यांची वातप्रकृती आहे व ज्यांना वातविकार आहेत, त्यांनी मका खाणे टाळावे.

dr.sharda.mahandule@gmail.com