– वनिता पाटील

मंगला नारळीकर गेल्या. डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख ज्यांना माहीत आहे, त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच! कारण ‘गणिती’ अशी ओळख निर्माण करणं सोपी गोष्ट नाही. एरवी भल्याभल्यांना गणित हा विषय कायमच अवघड आणि दांडी उडवणारा वाटत आलेला आहे. तेव्हा त्या विषयात उच्च प्रावीण्य मिळवणारी व्यक्ती निदान शालेय जीवनात तरी हुषारीमधला शेवटचा शब्द असते. गणितासारख्या क्लिष्ट विषयातील आपल्या अंगभूत बुद्धिमत्तेमुळे मंगला नारळीकर गणितज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या.

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Who is Landmark Group CEO Renuka Jagtiani
एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?

स्त्रीनं हुषार असायला हरकत नाही, पण तिनं त्या हुषारीची मान्यता मात्र मागू नये, अशी अपेक्षा एकेकाळी बाळगणाऱ्या आपल्या समाजात एखाद्या स्त्रीनं गणितज्ञ ही मान्यता स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवणं, हे पुरुषानं सुगरण ही मान्यता मिळवण्याइतकंच दुर्धर!

हेही वाचा – ‘ग्रीनहाऊस’च्या परिणामांवर प्रथम संशोधन कोणी केले ? डॉ. युनिस फूट कोण होत्या ?

प्रगत गणित या विषयाच्या जाणकार, लहान मुलांना अगदी सोप्या पद्धतीनं गणित समजावण्यात हातखंडा असलेल्या मंगलाताईंनी गणित या विषयावर पुस्तकंही लिहिली आहेत. आजच्या काळात मुलींना हव्या त्या विषयात शिकता येतं. करिअर घडवता येतं. पण साठच्या दशकात अशी सामाजिक परिस्थिती नव्हती. तेव्हाच्या त्या वातावरणात एक मुलगी आपल्याला हव्या त्या- म्हणजे खरं तर इतरांच्या दृष्टीनं गणितासारख्या क्लिष्ट विषयात उच्च शिक्षण घेते, त्यात अव्वल येऊन सुवर्णपदक मिळवते, तेव्हा ती किती मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असते, ते आज सगळ्याच गोष्टी सहज उपलब्ध असलेल्यांना समजणार नाही.

गणित या विषयात पदव्युत्तर शिक्षणात सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्या ‘टीआयएफआर’ या संस्थेत संशोधन करू लागल्या. पण डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी झालेल्या विवाहानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं. भारतातून उठून त्यांना केंब्रिजला जावं लागलं. तिथे जाऊन त्यांनी केंब्रिज विद्यापीठात गणित हा विषय शिकवायला सुरुवात केली. पुढे भारतात आल्यावर त्यांनी संश्लेषात्मक अंक सिद्धांत या विषयावर पीएच.डी. मिळवली. त्याबरोबरच एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा, ही शालेय विद्यार्थ्यांसाठीची त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

डॉ. जयंत नारळीकर हे नाव फार मोठं आहे. सहसा मोठ्या व्यक्तींच्या परिवारामधल्या इतरांचं कर्तृत्व झाकोळलं जातं. पण मंगला नारळीकर यांच्या बाबतीत असं झालं नाही. अत्यंत बुद्धिमान अशा जयंतरावांबरोबर आपलं आयुष्य जगतानाही त्यांनी आपलं मंगलपण जपलं, वाढवलं. आपल्या कर्तुत्वाची बेरीज केली, वजाबाकी होऊ दिली नाही, एवढं त्यांचं गणित पक्कं होतं! त्याशिवायही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू सांगण्यासारखे आहेत. त्यांची प्रयोगशील वृत्ती, कलासक्तता, टापटीप, लेखन-वाचन, त्यांची सामाजिक बांधिलकी, सडेतोडपणा… याबरोबरच ८० वर्षांच्या आयुष्यात तब्बल दोन वेळा त्यांनी दिलेली कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सांगण्यासारखं म्हणून जेवढं असू शकतं, त्यापेक्षाही काकणभर जास्तच मंगलाताईंच्या ओंजळीत होतं.

हेही वाचा – ‘… आणि मी तेलुगू बोलू लागले’- रकुल प्रीत सिंग

गणितासारखा विषय ही काही स्त्रियांनी वाट्याला जायची गोष्ट समजली जात नव्हती, अशा काळात जन्मलेल्या अत्यंत वेगानं गणित करणाऱ्या शकुंतलादेवींसारख्या विदुषीवर चित्रपट निघाला. मंगलाताई अत्यंत बुद्धमान गणितज्ञ होत्या. त्यांच्यावर असा काही चित्रपट निघू शकेल का, ते माहीत नाही, पण बुद्धीच्या क्षेत्रात धोपट मार्ग न निवडणाऱ्या स्त्रियांमध्ये त्यांचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जाईल, यात शंका नाही.

(lokwomen.online@gmail.com)