कोणत्याही व्यवसाय उभा करण्यासाठी पैसा, योग्य शिक्षण किंवा त्यातील योग्य माहिती असणे आवश्यक असते. अन्यथा व्यवसायात तुम्हाला अपयश येण्याची शक्यता असते. पण तुम्ही ऐकलं असेल की, यातील कोणतीही गोष्ट नसतानाही अनेक बड्या उद्योजकांनी व्यवसायात मोठे यश मिळावले. अशाचप्रकारे व्यवसायाचे कोणतेही ज्ञान नसताना एका भारतीय वंशाच्या शिक्षिकेने परदेशात तब्बल ३३० कोटींच्या व्यवसायाचे साम्राज्य निर्माण केले आहे. त्या आज सिंगापूरमध्ये यशस्वीपणे प्री- स्कूल चालवत आहेत. याशिवाय त्यांनी क्रिएटिव्ह गॅलिलिओ हे लर्निंग अॅपही सुरू केले आहे. प्रेरणा झुनझुनवाला असे या यशस्वी महिला व्यावसायिकेचे नाव आहे.

सध्याच्या घडीला भारतातील एक यशस्वी व्यावसायिक महिला म्हणून प्रेरणा झुनझुनवाला यांचे नाव घेतले जाते. सिंगापूरमध्ये त्यांनी सुप्रसिद्ध लिटल पॅडिंग्टन प्रीस्कूलची स्थापना केली. यानंतर ३ ते १० वयोगटातील मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी क्रिएटिव्ह गॅलिलिओ नावाचे एक एज्युटेक अॅप सुरु केले. या अॅपच्या माध्यमातून मुलांमध्ये वाचन संसकृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास

याशिवाय त्यांनी टून्डेमी आणि लिटल सिंघम हे दोन ऍप्लिकेशनही विकसित केली आहेत. ज्याच्या डाउनलोडची संख्या एक कोटींहून अधिक आहे. भारतात प्लेस्टोअरवर तरुणांसाठी हे एकमेव एज्युकेशन अॅप्लिकेशन आहे जे टॉप 20 मध्ये गणले जाते.

प्रेरणा झुनझुनवाला यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्या लहान मुलांसाठी नॅरेटिव्ह व्हिडीओ, गेमिफिकेशन आणि पर्सनलाइज्ड लर्निंग जर्नी प्रोव्हाईड करतात.

प्रेरणा झुनझुनवाला कोण आहेत?

प्रेरणा झुनझुनवाला यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून सायन्समध्ये पदवी घेतली. स्टार्टअप सुरु करणारे अनेकजण सामान्यत: IIT, IIM किंवा इतर बिझनेस स्कूलमधून योग्य शिक्षण पूर्ण करतात. पण प्रेरणा झुनझुवाला यांनी कोणताही औपचारिक व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. तरीही त्यांनी आज ३३० कोटींचा एक यशस्वी व्यवसाय उभा केला.

गेल्या वर्षी त्यांच्या या व्यवसायात सुमारे ६० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. प्रेरणा झुनझुनवालाच्या स्टार्टअपचे मूल्य मागील वर्षी ४० दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास ३३० कोटी रुपये होते.

प्रेरणा झुनझुनवाला यांनी मार्केटिंगवर फारच कमी खर्च केला. त्यांच्या स्टार्टअपची ग्रोथ ऑर्गेनिक पद्धतीने होत आहे. त्यांच्या स्टार्टअपमध्ये सध्या ३० लोक काम करत आहेत. तर एका वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करून ६० करण्याची योजना आहे.

इंडोनेशिया, व्हिएतनाममध्येही कंपनी सुरू करण्याची योजना

सध्या इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्येही कंपनी लॉन्च करण्याचे प्रयत्न सुरु आहेत आहे. तसेच कंपनी विविध स्थानिक भाषांमध्येही कंटेंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्या त्यांचा सिंगापूरचा उपक्रम सात शाळांमध्ये सुरु आहे.