डॉ. स्वाती हजारे
स्तन, स्तनपान, मातेमध्ये स्तनपानादरम्यान होणारे बदल आणि स्तनपानामध्ये मातेस येणाऱ्या अडचणी आपण या लेखामध्ये समजून घेणार आहोत. स्तन या अवयवाची निर्मिती गर्भाच्या चौथ्या ते पाचव्या आठवड्यापासून सुरू होते. पुढील नऊ महिन्यांच्या काळात स्तनांच्या विविध भागांची निर्मिती आणि वृद्धी होते. जन्मानंतरही पुढे ही स्तनवाढ मानवी शरीरात सुरू राहते. मानवी शरीरातील इतर अवयवांची पूर्ण वाढ काही महिने किंवा काही वर्षात पूर्ण होते. परंतु सर्वात शेवटी स्तन पूर्ण वृद्धीच्या अवस्थेला पोहचतात; ते म्हणजे गर्भधारणा ते प्रसव/ प्रसूती. प्रसूती होईपर्यंत स्तनपेशी संख्या आणि आकाराने गर्भावस्थेत वाढत असतात. प्रसूती झाली की त्यांची वाढ थांबून त्या स्तनपेशी कार्यरत होतात.

आणखी वाचा : ‘ती’च्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

काही बालकांमध्ये जन्मानंतर त्यांच्या छोट्या स्तनांमधून काही प्रमाणात दूधबाहेर येत असते. मातेच्या प्रसवादरम्यानच्या हार्मोन्समुळे हे होत असते. हे हार्मोन्स प्रसवप्रक्रियेदरम्यान मातेच्या शरीरातून बाळामध्ये जातात आणि या गोष्टी होतात. ही अगदी स्वाभाविक, नैसर्गिक गोष्ट आहे. या दुधाचे प्रमाण अगदी थोडेसे असते. महत्त्वाचे म्हणजे याला फक्त पुसून घ्यावे. स्तन पिळून-दाबून हे दूध काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. कारण हार्मोन्सचे प्रमाण बाळाच्या शरीरातून कमी होऊ लागते, तसे ते दूध पूर्ण बंद होते. परंतु पिळून किंवा दाबून काढण्याच्या प्रयत्नात बाळाचे स्तनांना जंतूसंसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि हा प्रकार नवजात बालकांसाठी अतिशय त्रासदायक ठरू शकतो.

आणखी वाचा : नातेसंबंध : शिक्षक नव्हे… टकल्या नि सडकी?

जेव्हा स्त्रीस गर्भधारणा होते तेव्हा १६ व्या आठवड्यांपासून तिच्या स्तनांमध्ये दूध तयार होऊन ते साठविण्यास सुरुवात होते. परंतु गर्भावस्थेतील काही संप्रेरके – हार्मोन्स त्याला बाहेर पडण्यास थांबवते. प्रसूती झाली आणि वार बाहेर पडली की दुधाला थांबविणारे हार्मोन्स कमी होऊन दूध बाहेर पडण्यास सुरुवात होते. प्रसवपश्चात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसाला स्तन कडक होतात. पुढील दोन – तीन दिवसात हळूहळू हा कडकपणा कमी होऊ लागतो. या अवस्थेला इन्गॉरजमेंट (Engorgement) असे म्हणतात.

आणखी वाचा : उपयुक्त : ‘फॅशन सर्च’मध्ये ‘ट्रेण्डिंग’ असलेले ‘को-ऑर्डस्’ आहेत तरी काय?

बाळ जन्माला आले की बाळाला कोरडे करून लगेच आईच्या पोटांवर ठेवले जाते. ते हळूहळू रांगत आईच्या स्तनांवर येते, याला ब्रेस्ट क्रॉव्ल (Breast Crawl) असे म्हणतात. विशेष म्हणजे यावेळी नुकतेच जन्मलेले हे बाळ स्वत: स्तनांना तोंडात धरून दूध ओढण्यास सुरुवात करते. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये सध्या हे नियमित केले जाते. नंतर बाळाला डोक्यावर टोपी घालून तिथेच आईच्या स्तनांवर ठेवले जाते. ज्याला स्किन टू स्किन (Skin to Skin) असे म्हणतात. यामुळे बाळाचे तापमान अगदी हवे तेवढे राखण्यास मदत होते. तसेच प्रसव प्रक्रियेमध्ये आलेला ताण, थकवाही दूर होण्यास मदत होते.

आणखी वाचा : दिवाळीसाठी ग्रीटिंग कार्ड मिळाले नाही म्हणून तिने…; लॉकडाउनमधील गैरसोयीतून सुचलेल्या कल्पनेने काय केले पाहा

बाळ शांत आईच्या अंगावर झोपून जाते. पुढील ४५ – ६० मिनिटे त्याला तसेच ठेवले जाते. नंतर पुढील स्तनपानांच्या काळातही मातांनी आपल्या बाळांना पाजायला घेण्यापूर्वी असे स्किन टू स्किन किंवा कांगारू केअर (Kangaroo Care) कमीत कमी १० – १५ मिनिटे तरी करावी. यामुळे आईचे दुधाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते, शिवाय बाळांनाही त्यांच्या तापमान नियंत्रणाबरोबरच एक सुरक्षिततेची भावनाही मिळते. ज्यामुळे त्यांचे रडण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या वजनवाढीसाठीही मदत होते.

आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?

बाळाला दीड ते दोन तासांनी स्तनांना लावावे. सुरुवातीला दुधाचे प्रमाण कमी असले तरी हे चालू ठेवावे; कारण प्रमाण कमी असले तरी बाळ त्यांच्या आवश्यकतेएवढे ओढून घेतात फक्त इन्गॉरजमेंट म्हणजे तिसऱ्या- चौथ्या दिवशी स्तनांच्या कडकपणामुळे – सूज असल्याने बाळाला स्तन धरण्यास अवघड जाते, अशावेळी तज्ज्ञांच्या मदतीने ही सूज कमी करून बाळाला स्तन पकडण्यास मदत केली जाते. जर काही कारणास्तव बाळाला स्तन पकडण्यास जमले नाही तर हाताने हलक्या पद्धतीने मसाज करून हे दूध बाहेर काढून वाटी – चमच्याने बाळास पाजावे. ही सूज दोन – तीन दिवसांत कमी झाली की पुन्हा स्तन मऊ झाल्याने बाळास स्तन धरण्यास सोपे जाते.

आणखी वाचा : उपयुक्त : कुडता, टॉप, ब्लाऊज- गळ्यांच्या फॅशनमध्ये वैविध्य

काही कारणास्तव बाळाने स्तनांवर दूध प्यायले नाही तर हाताने दाबून (Hand Expression) हे दूध काढत रहावे. अन्यथा दूध साठत जाऊन त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे आईला स्तन – वेदना चालू होतात. अशावेळी लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा स्तनपानतज्ज्ञ यांना भेटून यावर उपाय करून पुढील संभाव्य धोके टाळावेत.

आणखी वाचा : बाळाचा पहिला आहार कसा असावा ?

काही मातांना प्रमाणापेक्षा अधिक दुधाची निर्मिती होते. यामध्येही हा गाठी होण्याचा धोका असतो. कारण बाळ त्याला हवे तेवढेच दूध पिते. परंतु प्रमाण अधिक असल्याने उरलेल्या दुधाच्या गाठी तयार होतात. याला ‘ओव्हर सप्लाय’ असे म्हटले जाते. यातही ही अवस्था ओळखून तज्ज्ञांद्वारे हे प्रमाण आटोक्यात आणले जाऊ शकते.

आणखी वाचा : बाळाच्या वाढीनुसार बदलणाऱ्या स्तनदुधाच्या अवस्था

अत्याधिक प्रमाण, याबरोबर अत्यल्प दुग्धनिर्मिती अशीही काही मातांमध्ये अवस्था असते, ज्यामध्ये बाळाचे पोट भरत नाही.
दूध कमी येण्याची कारण
१) आईचे वय (३५ वर्षांपेक्षा जास्त असणे)
२) आईस असलेल्या काही व्याधी उदा.- थायरॉईड, मधुमेह, उच्चरक्तदाब किंवा इतर.
३) आईच्या स्तनांच्या विकृती/ आजार/ स्तनांवर किंवा छातीवर झालेली शस्त्रक्रिया.
४) आईला काही औषधोपचार चालू असणे, जे स्तनपानासाठी विरोधक आहेत.
५) आईचे तंबाखू / सिगारेट/ अल्कोहोल यांचे सेवन

आणखी वाचा : उपवस्त्र ते प्रतिष्ठितवस्त्र

या आणि काही इतरही अवस्था ज्यामध्ये आईच्या दुधाचे प्रमाण कमी होते. अशावेळी मातांनी लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा स्तनपानतज्ज्ञ यांना भेटून उपचार सुरू करावेत. जेवढे लवकर उपचार सुरू होतील तेवढे लवकर दूध येणे व तेवढ्या लवकर प्रमाण वाढविण्यास मदत होऊ शकते.
drswatihajare@gmail.com