तो १: काय चालुये जगात काय कळत नाही..
तो २: लवकर कळलं हे तुला. पण आता अचानक काय झालं तुला?
तो १: अरे, जगाचा काय भरोसा उरला नाय आपल्याला. कधी पण संपेल. ही बातमी बघ ना..बघ बघ..वाच जरा..बघ
तो २: थांब ना बाबा.. आता काय घशात टाकणारेस का फोन.. इतकी काय वाईट बातमी आहे? त्या आधी, मला सांग, तू एक कटींग
तो १: तुला कटींगचं पडलंय.. इथे जगात काय समस्या सुरु आहेत, पत्ता आहे की नाही तुला?
(२ त्याच्याकडे रोखून बघतो.) हा..चालेल मला एक कटींग.
आणखी वाचा : सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?
तो २: ए मित्रा दोन कटींग दे रे. कडक बनव हा एकदम. हां दे आता. बघू कुठे आग लागलीये. (१ चा फोन हातात घेऊन) लग्नासाठी गावात मुलीच नसल्याने मुलांचं आंदोलन. काय बातमी ए ही. कसल्या बातम्या करतील ना हे मीडीयावाले..काय पण आपलं.
तो १: तू वेडा-बिडा एस का रे? किती मोठी बातमी आहे ही. यार मुलांना लग्नासाठी मुलीच मिळतं नाहीयेत. गावातल्या मुली संपल्या. सं. प. ल्या. कळतंय का तुला किती मोठा इश्यू आहे हा.
तो २: मुली संपल्या तरी हा चहा कधीच संपणार नाही. घे..मस्त कडक कटिंग. तू कशाला इतका हायपर होतोस आणि.. त्यांच्या गावच्या मुली संपल्या तर दुसऱ्या गावातल्या मुलींशी लग्न करतील इतकं काय..मी सांगतो हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे रे.. आजकाल लोक कोणत्या पण थराला जातात प्रसिद्धीसाठी.
तो १: नाय रे. तू नीट बघत नाहीयेस इश्यूकडे. आज त्यांच्या गावात मुली नाहीयेत, उद्या त्यांच्या शेजारच्या गावात नसतील, असं करता करता आपल्या शहरात पण सेमच होणार. आपलं काय होणार रे, टेन्शन आलं मला.
आणखी वाचा : लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!
तो २: चहा पिताना असले फालतू जोक करत जाऊ नकोस हा तू. आत्ता सांडला असता. मित्रा, आपलं तसंही काही होणार नव्हतं. तुला काय वाटतं, आत्ताच्या मुली, आपल्यासारख्या काठावर इंजिनीअरिंग पास झालेल्या, दहा हजार पगार असलेल्या, स्वतःचं घर, गाडी आणि जिम बॉडी नसलेल्या मुलांशी लग्न करतील? मित्रा, आपलं भविष्य तसंही अंधारात आहे, मुली असल्या काय नसल्या काय..
तो १: काय बोलतोयस यार तू, इतकं पण वाईट नाहीये. होऊ शकतं पण अजून नाहीये. आता निदान थोडीशी आशा तरी आहे की कोणीना कोणी मुलगी आपल्याला हो म्हणेल, पुढे मुलीच नसल्या तर हो काय, नाही म्हणायला सुद्धा कोणी नसेल. काय बेक्कार परिस्थिती आहे रे.
तो २: तू कशाला इतका पुढचा विचार करतोयस? मुली काही उद्या गायब होणार नाहीयेत. आपलं आयुष्य भरेपर्यंत किमान मुली असतीलच. त्यामुळे ही समस्या आपल्या पिढीसाठी नाही, आपल्या पुढच्या पिढींची आहे, त्यांनी बघावं काय ते.
तो १: त्यांचे तर बेक्कार हाल आहेत रे. विचार कर, १०० मुलांपाठी फक्त पाचच मुली उरल्या तर काय होईल. कसली गळचेपू स्पर्धा होईल.. मुली हुंडा घ्यायला सुरु करतील, मुलगा लाखात देखणा असेल, अतिश्रीमंत असेल तर कुठे त्याची लग्नाची बोलणी सुरू होतील, नाहीतर बाकी बिचाऱ्यांचा सक्तीचा संन्यास..
आणखी वाचा : …म्हणून रात्री ‘ब्रा’ घालून झोपू नये
तो २: तो आताही कुठे चुकलाय.. सुरुच आहे. आजकाल पण त्याच मागण्या आहेत. आपल्यासारख्या अतिमध्यमवर्गातल्या मुलांनी करायचं काय.. ना नोकरी धड ना छोकरी. सगळ्यासाठी स्ट्रगल..आयुष्यभर.
(दोन मिनिट अस्वस्थ शांतता)
कशाला रे असल्या बातम्या सांगतोस रविवारच्या. एकच सुट्टीचा दिवस, त्यात पण हे असलं काहीतरी ऐका..श्या.. पूर्ण वीकेण्ड मूडची वाट. काय यार तू,
तो १: तसंही या वीकेण्ड मूडचं काय करणारेस तू. इथेच माझ्यासोबत घालवणारेस. मित्रा, अजून दोन कटींग दे रे…