संयुक्त अरब आमिरातचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम शेख महराने पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तिचीइ न्स्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. आता तिने सोशल मीडियावरुन घटस्फोट घेतला आहे. ज्यामुळे शेख महरा चर्चेत आली आहे.

शेख महराने इन्स्टाग्रामवर पतीला कळवला घटस्फोट

मकतूम यांची मुलगी शेख महरा यांनी त्यांचे पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्यापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा इन्स्टाग्रामवर केली. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलंय की, “प्रिय पती, तू इतर लोकांमध्ये व्यग्र असल्याने मी घटस्फोट जाहीर करते. मी तुला घटस्फोट देते”, असं त्यांनी डिजिटल घटस्फोट जाहीर केला आहे. यामुळे शेख महराची चर्चा होते आहे. कोण आहे ही शेख महरा आपण जाणून घेऊ.

कोण आहे शेख महरा?

शेख महराचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ मध्ये युएईतल्या दुबईत झाला. शेख महरा २९ वर्षांची आहे. ती अमीराती आणि ग्रीस अशा दोन्ही देशांशी संबंध असणारी मुलगी आहे कारण तिची आई जो ग्रिगोराकोस ग्रीसची आहे.

हे पण वाचा- “प्रिय पती, तुम्ही इतर ठिकाणी व्यग्र असल्याने…”, UAE च्या पंतप्रधानांची लेक शेख महरा यांनी इन्स्टाग्रामवरून पतीला दिला घटस्फोट!

शेख महराने तिचं प्राथमिक शिक्षण दुबईतल्या एका खासगी शाळेत घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तिने ब्रिटनमधल्या एका विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन या विषयात पदवी घेतली आहे. तसंच मोहम्मद बिन राशिद यांच्या महाविद्यालयातूनही एक पदवी घेतली आहे. शेख महरा तिच्या सामाजिक कार्यांसाठी ओळखली जाते. महिला सशक्तीकरण आणि स्थानिक नक्षीकाम करणाऱ्यांना ती पाठिंबा देते. याशिवाय ती घोडेस्वारीसाठीही प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Who Is Sheikha Mahra?
जाणून घ्या शेख महरा कोण आहे, तिच्या घटस्फोटाची चर्चा का होते आहे?

शेख महराचं लग्न २०२३ मध्ये

शेख महराचं लग्न २०२३ मध्ये बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झालं. मे महिन्यात शेख महरा बिंतला एक मुलगी झाली. तिचं नाव शेख महराने माना बिन मोहम्मद अल मकतूम असं ठेवलं आहे. या गोड बातमीला अवघे दोन महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेख महराने घटस्फोट घेतल्याचं इन्स्टाग्रामवर जाहीर केलं आहे. शेख महराने हा आरोप केला आहे की तिचे पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात आहेत, त्या दोघांचं अफेअर सुरु आहे त्यामुळे मी त्याच्यापासून विभक्त होते आहे. विशेष बाब म्हणजे घटस्फोटाची ही घोषणा शेख महराने केल्यानंतर तिने आणि तिच्या पतीने दोघांनीही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. शेख महराने ज्या प्रकारे तिचा घटस्फोट जाहीर केला ते एक धाडसी पाऊल मानलं जातं आहे.