मुलींना मासीक पाळी लवकर सुरु झाली तर काय बिघडलं? त्याचे काही दुष्परिणाम होतात का ? होय. ते होतात आणि आजच्या आईबाबांनी ते लक्षात घेण्यासारखे आहेत.

मेनार्क म्हणजे मासिक पाळीची सुरुवात. स्त्रीच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना. शंभर एक वर्षांपूर्वी मेनार्कचं सरासरी वय होतं १४ वर्षं. आणि आता ते आलंय १२ पर्यंत खाली. प्रत्येक दशकाबरोबर हे वय ३-३ महिने खाली येत चाललंय असं अहवाल सांगतो. का होतंय असं ?
केवळ पन्नास एक वर्षांपूर्वी मुलीची मासिक पाळी १० वर्षांच्या आधी सुरु झाली तर त्या घटनेला मुदतपूर्व वयात येणं, म्हणजे ‘प्रीकॉशस प्युबर्टी ‘ म्हणायचे. त्यावेळी काही गंभीर कारणांचा विचार केला जायचा – उदा. गुणसूत्रीय दोष, मेंदूला मार लागणे, जंतुसंसर्ग, किंवा ट्यूमर, एंडोक्राइन ग्रंथींचे विकार इत्यादी.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Career
मुलांचं करिअर घडवायचं आहे, पण कसं? प्रत्येक आईने ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात!

आज परिस्थिती काय आहे? तर वरीलपैकी कोणतंही कारण नसताना मासिक पाळी आठव्या, नवव्या, दहाव्या वर्षी सुरु होते आणि अशा मुलींची संख्या दुर्लक्ष करण्यासारखी राहिलेली नाही. आज बहुतेक शाळांमधून मुलींना मासिक ऋतुचक्राची शास्त्रीय माहिती दिली जाते, ही चांगली गोष्ट आहे खरी, पण ही माहिती कधी द्यावी? सहावी -सातवीत की तिसरी -चौथीत असताना? आजच्या मातासुद्धा जागरूक असतात. वेळ आली की मुलीला या बाबतीत सज्ञान करून सोडायचं त्यांनी मनात योजलेलं असतं. पण तिसरीतली लेक जेव्हा मासीक पाळी सुरु झाली म्हणून शाळेतून रडत रडत घरी येते तेव्हा तिच्यापेक्षा तिच्या आईच्या पोटात धस्स होतं आणि बाबा तर हतबुद्धच होतो.

हेही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ते KKR ची जबाबदारी! शाहरुख खानचा सगळा कारभार सांभाळणारी पडद्यामागची हिरो पूजा ददलानी आहे तरी कोण?

लहान लहान मुली इतक्या लवकर ‘वयात’ कशा यायला लागल्या? बघता बघता त्यांच्या शरीराची ठेवण बदलली, स्त्रीत्वाची बाह्य लक्षणं अंगावर उमटू लागली. यांना अजून होमवर्क वेळेवर करता येत नाही, तर मग त्यावेळचे ते आवश्यक कपडे (सॅनिटरी पॅड्स) कसे वापरायचे हे कसं कळणार? स्वच्छता कशी पाळायची, डाग पडून फजिती होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, स्कूलबॅग मधे कोणत्या गोष्टी बरोबर न्यायच्या आणि मुख्य म्हणजे हे सगळं चाललंय तरी काय, हे इतक्या छोट्या मुलींना समजावताना आई हवालदिल होते आणि डॉक्टरांचं ऑफिस गाठते.

देशोदेशीच्या तज्ञांनी केलेल्या वैद्यकीय पाहण्यांचे निष्कर्ष असे आहेत- पाळी लवकर सुरु होण्याची कारणं अनेक आहेत आणि बहुतेक सारी आपल्या आजच्या शहरी जीवनशैलीशी निगडित आहेत. सदोष , म्हणजे उष्मांक आणि स्निग्ध पदार्थ यांची रेलचेल असणारा आहार- यात सर्व तऱ्हेचं जंक फूड, बेकरीचे पदार्थ, फॅन्सी डेझर्टस, मुद्दाम गोड बनवलेले फळांचे ज्यूसेस, आइसक्रीम्स हे सारं आलं. याला जोडून असतो मोकळ्या हवेतल्या व्यायामाचा अभाव, कारण अशा मुलांची खेळांची आवड व्हिडिओ गेम्स पुरतीच असते. या खेरीज वय ३ ते ५ वर्षांपासून सुरु झालेला मांसाहार, आणि तान्हेपणी दिलेलं ‘फॉर्म्युला फीड’ , तसंच तीव्र स्वरूपाची व्हीटामीन डी ची कमतरता याही गोष्टी कारणीभूत असाव्यात असं संशोधकांचं म्हणणं आहे. अमर्यादित स्क्रीन टाइम आणि वयाला अनुरूप नसलेली दृश्यं डोळ्यासमोर येणे, हा महत्त्वाचा घटक. यामुळे अगदी लहान वयात मानसिक आणि लैंगिक उत्तेजना मेंदूला मिळते, लैंगिकतेशी संबंधित एंडोक्राइन ग्रंथींवर असणारा मेंदूचा ताबा (रिलीज मेकॅनिझम ) गळून पडतो आणि हार्मोनल स्राव नको त्या वयात सुरु होतात. बरं , मग पाळी झालीच लवकर सुरु, तर काय बिघडलं ? त्याचे काही दुष्परिणाम होतात का ? होय. आणि आजच्या आईबाबांनी ते लक्षात घेण्यासारखे आहेत.

हेही वाचा : आता ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये बंदी! ICC चा मोठा निर्णय…; काय आहे कारण?

लवकर वयात येण्यामुळे काही मुली खूपच बुजऱ्या आणि एकलकोंडया होतात. काही तर नैराश्याच्या बळी होतात. याउलट, काहींमधील लैंगिकतेची जाणीव जागृत झाल्यामुळे, कोवळ्या वयात लैंगिक अनुभव घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते किंवा त्या लैंगिक अत्याचारालाही बळी पडू शकतात. यातून कोवळ्या जननेंद्रियाला इजा किंवा योनिमार्गाचा दाह होण्याची शक्यता असते. पुढच्या आयुष्यातल्या कामजीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एकंदर कामजीवनाबद्दल घृणा किंवा भीती निर्माण होऊ शकते.

चुकीच्या जीवनशैलीचे दुष्परिणाम तर आपल्याला माहीतच आहेत. स्थूलपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातील मेद वाढल्यामुळे हृदयविकाराची शक्यता, याबरोबरच स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण हेही यात येतं. पाळी सुरु झाल्यावर थोड्याच वर्षात हातापायांच्या हाडांची लांबी वाढणं कमी होऊ लागतं आणि नंतर थांबतंच. जितकी पाळी लवकर सुरु होते तितकी मुलीची उंची वाढणं लवकर बंद होतं. मग अशा मुली इतर चारचौघींपेक्षा बुटक्या राहतात.

हेही वाचा : जोडीदाराची उत्पन्न क्षमता आणि देखभाल खर्च

एकंदरीत मुलीची पाळी योग्य वयात , म्हणजे १२ ते १६ पर्यन्त चालू झालेली चांगली. यात पालकांची भूमिका काय असावी? खूप सारी शास्त्रीय निरीक्षणं नोंदवून आपण पुन्हा अगदी मूळ पदावर म्हणजे मूलभूत तत्त्वांवर येतो. मुलगा असो की मुलगी, लहान वयातच खेळांची, शारीरिक हालचालींची आवड लावली पाहिजे. केवळ आपली सोय म्हणून चुकीचे खाद्यपदार्थ मुलांना देऊ करणं म्हणजे ‘सुजाण ‘ पालकत्व नाही. स्क्रीन टाइम आणि स्क्रीन कंटेंट यावर आपलं लक्ष हवं. मुलीच्या शरीरात घडणाऱ्या बदलांच्या बाबतीत आईबाबांनी जागरूक असणं गरजेचं आहे. मुलीला समजेल अशा भाषेत मासिक पाळीची शास्त्रीय माहिती देण्याचं काम जितकं शाळेचं किंवा डॉक्टरांचं आहे, त्याहून जास्त तुमचं-आईबाबांचं आहे. कारण तुम्हीच तिचे अगदी निकटचे, विश्वासाचे दोस्त असता.

drlilyjoshi@gmail.com