अभिनेता शाहरुख खान गेल्या ३० वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. किंग खानचे चाहते फक्त देशातच नाही, तर जगभरात आहेत. त्यामुळे त्याचा कुठलाही चित्रपट जगभरात बक्कळ कमाई करताना दिसतो. दरम्यान प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते. त्याप्रमाणे बादशाहच्या मागे पत्नी गौरी खानप्रमाणे आणखी एक स्त्री आहे. ती म्हणजे मागील १० वर्षांहून अधिक काळापासून किंग खानचा कारभार सांभाळणारी विश्वासू, निष्ठावंत, बुद्धिवान मॅनेजर पूजा ददलानी.

नेहमी कलाकारांची अधिक चर्चा होत असते. पण त्यांच्या मॅनेजरबद्दल जास्त बोललं जात नाही. कारण मॅनेजर पडद्यामागील सर्व काही कामं पाहत असतो. मात्र यामध्ये सगळ्यात उजवी ठरते पूजा ददलानी. ती शाहरुखची मॅनेजर असली तरी ती तिच्या कामामुळे तितकीचं लोकप्रिय आहे. आज आपण याच पूजा ददलानी विषयी जाणून घेणार आहोत…

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली ती म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे. आर्यन जेलमध्ये गेल्यापासून पूजा आर्यनला भेटण्यासाठी एनसीबी ऑफिस आणि कोर्टात नियमित दिसायची. आर्यनला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्यात पूजाचा मोठा हातभार आहे. शाहरुखने मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी नेमलेले वकील जितके प्रयत्न करत होते, तितकेच पूजा करताना दिसत होती. या प्रकरणामुळे पूजाची अधिक चर्चा होऊ लागली.

हेही वाचा – आता ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये बंदी! ICC चा मोठा निर्णय…; काय आहे कारण?

पूजाचे शाहरुखप्रमाणे त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. गौरी आणि सुहाना खान पूजाला त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग मानतात. म्हणूनच गौरी किंवा सुहानाच्या वैयक्तिक पार्टी किंवा कार्यक्रमातही पूजा ददलानी दिसते. पूजा ही २०१२ पासून शाहरुखची मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. विशेष म्हणजे दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला असतो. यादिवशी शाहरुख कितीही कामात व्यस्त असला तरी मॅनेजर पूजासाठी खास वेळ काढून तिचा वाढदिवस साजरा करताना दिसतो.

पूजाचे शालेय शिक्षण मुंबईतील बाई अवाबाई फ्रामजी पेटिट गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले आहे. तसेच तिचे पुढील शिक्षण एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून झाले आहे. शिवाय तिने मास कम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. याच पदवीचा पूजाने उत्तमरित्या वापर करून ती आज शाहरुख खानचा उजवा हात झाली आहे, असं म्हणणं काही वावगं ठरणार आहे. पूजाने लहान वयात मिळवलेलं हे यश एक उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा – मिस युनिव्हर्सची पहिली प्लस साइज मॉडेल! सुंदर दिसण्यासाठी वजन महत्त्वाचं नाही सांगणाऱ्या जेन दीपिका गॅरेटविषयी जाणून घ्या

शाहरुखच्या चित्रपटांपासून ते रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीपर्यंतचा सर्व कारभार पूजा सांभाळते. शिवाय पूजाकडे आयपीएल टीम केकेआरची जबाबदारी आहे. तसेच शाहरुखला कोण भेटणार? कोण नाही? याची धुरा देखील तिच्याकडेच आहे. अशा सर्व प्रकारची किंग खानची काम सांभाळण्यासाठी पूजाला वर्षाला ७ ते ९ कोटी मानधन मिळते. तसेच २०२१च्या एका अहवालानुसार, पूजाची संपत्ती ४० ते ५० कोटी आहे. गेल्या दोन वर्षात या संपत्तीत आणखी वाढ झाली असावी. याशिवाय पूजाकडे निळ्या रंगाची मर्सिडीज कार आहे. तसेच तिचे मुंबईतील वांद्र्यात आलिशान घर आहे. या घराचे इंटिरियर डिझाइन गौरी खानने केलं आहे.

पूजाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर, तिचं २००८ साली हितेश गुरनानीशी लग्न झालं आहे. हितेश एक व्यावसायिक असून तो लिस्टा ज्युल्स नावाच्या कंपनीचा संचालक आहे. दोघांना रेना नावाची मुलगी आहे. दरम्यान बॉलीवूडमध्ये शाहरुख जितका चर्चेत असतो तितकीच त्याची ही हुशार मॅनेजर पूजा ददलानी चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. शाहरुखच्या प्रत्येक चित्रपटाविषयी अपडेट देत असते. तसेच किंग खानच्या कुटुंबातील इतर सदस्यांविषयी पोस्ट शेअर करत असते.