संदीप चव्हाण

आपल्याकडे एकत्र कुटुंबात, लग्न समारंभात, एखाद्या कार्यक्रमात वा हॉटेलात तेला-तुपाचे डबे वापरले जातात. हे डबे पत्र्याचे किंवा अनेकदा प्लास्टिकचे असतात. या डब्यांतही छान बाग फुलवता येते. या तेलाच्या डब्यांना छोट्या ॲक्सल ब्लेडने कापावे, म्हणजे डब्याच्या पत्राला धार येत नाही. कटर मशीनने कापल्यास धार येते व अपघाताची शक्यता वाढते. या डब्यांना उभा काप दिल्यास त्याचे दोन पसरट भाग तयार होतात. याची खोली पाच इंचांची भरते. त्यात कांदे, लसूण, पालक, मेथी, गव्हांकुर छानपैकी पिकवता येतात. तसेच हे पसरट भाग बोन्साय झाडे जतन करण्यासाठीही उपयोगात येतात. डब्यास आडवा काप दिल्यास त्याचे सात इंच खोलीचे दोन भाग तयार होतात. यात गवती चहा, मिरची, वांगे, आळूची पाने लावता येतात.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

आणखी वाचा : आहारवेद: स्रियांच्या विकारांमध्ये उपयुक्त आंबा

तसेच या अखंड डब्यांचे फक्त वरील भाग कापून घेतल्यास १४ इंच खोलीचा डबा मिळतो. त्यात हळद, ऊस, चवळी, मलबार पालक लागवड करता येतो. तसेच या डब्यांना तिरपा मधोमध काप दिल्यास त्याचे त्रिकोणी दोन भाग मिळतात. त्यातही पालेभाज्या लागवड करता येतात. डब्यांसाठी वापरलेल्या पत्र्याच्या गुणवत्तेवर डब्यांचे आयुष्यमान वाढते. तरी डबा दीड ते दोन वर्षे वापरता येतो. तसेच या दोन्ही डब्यांना शक्य असल्यास उत्तम रंगसंगतीचा वापर करून रंगवता येते किंवा यास तांबडा, काळा रंग दिल्यास त्यावर वारली पेंटिंगही करता येते. याच डब्यांप्रमाणे
प्लास्टिकच्या डब्यांच्याही वापर करावा.

आणखी वाचा : गच्चीवरची बाग : फ्लॅटच्या दाराबाहेरचा कोपरा

केळीचे कापलेले खांब
केळीचे घड एकदा झाडावरून उतरवून घेतले की त्याचे वेगवेगळ्या लांबीचे व जाडीचे खांब उपलब्ध होतात. हे खांब असेही वाळायला म्हणजे त्या खांबातील पाणी बाष्पीभवन होण्यास खूप वेळ लागतो. या खांबाचा टोकाकडील निमुळता भाग तासून घ्यावा. म्हणजे दोन्ही बाजूला सारख्याच जाडीचे खांब मिळतात. खांबाची जाडी बघून त्यात पाच इंच खोलीचे व तेवढ्याच लांबी-रुंदीचे खोलगट भाग तयार करावेत. त्यात माती भरून रोपवाटिका तयार करता येते किंवा पुदिना, पालक लागवड करता येते. हे खांब या प्रकारामुळे लवकर कुजून त्याचे खतात रूपांतर होण्यास मदत तर होतेच, पण त्यासोबत उपलब्ध कालावधीतही छान पालेभाज्या तयार करता येतात. केळीच्या खांबांची पायरी पद्धतीने मांडणी करून त्यावर भाजीपाला पिकवता येतो. जैविक कचऱ्याचे खतात रूपांतर तर होतेच, पण त्यातून बागेच्या सौंदर्यवाढीलाही मदत होते. अशा अनेक गोष्टींचा आपण कल्पकतेने वापर करू शकतो. एकदा खांब पाणी व उन्हामुळे मलूल झाला की त्याचे पदर उस्तरून त्यांना वाळवून घ्यावे, त्याचाही कुंड्या, वाफा पुनर्भरणासाठी उपयोग करता येतो.
sandeepkchavan79@gmail.com