तामिळनाडूतील पुदुक्कोट्टई येथे तुम्ही धनम पाटीच्या (आजीच्या) घरी भेट दिली तर तुम्हाला वाफळत्या इडली, चटणी आणि सांभारवर ताव मारणारे सर्व वयोगटातील लोक दिसतील. येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी खुर्च्या, टेबल्स आणि प्रवेशद्वार या सुविधा नसल्या तरीही आजीचे प्रेम मात्र भरभरून आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की गेल्या अनेक वर्षांपासून इडली विक्रीचा व्यवयास करणारी आजी फक्त २ रुपयांना इडली विकते आहे.
धनम पाटीने इडली विकण्याचा व्यवसाय का सुरू केला?
दोन मुले आणि आजारी पती-पत्नीसह कठीण आर्थिक परिस्थितीमुळे धनम पाटीने इडली विकण्याचा व्यवसाय सुरू केला. जेवणाची किंमत आर्थिकदृष्ट्या परवडमारी असले पाहिजे असे धनम पाटीचे ठाम मत आहे त्यामुळेच तिने जेव्हा या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा फक्त ३ पैशांना ती इडली विकत होती. मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिने इडलीच्या किंमतीमध्ये हळू हूळू वाढ केली. अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत धनम पाटी १ रुपयाला इडली विकत होती.आता ती फक्त २ रुपयांना इडली विकते.
धनम पाटीने तिचा व्यवसाय कधी सुरू केला?

तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तिने इडलीच्या किंमती वाढवल्या. इडलीची किंमत आणखी का वाढवली नाही असे विचारले असता ती उत्तर देते, “लोकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळायला हवे.”
तरीसुद्धा, इतरांना मदत करण्याच्या प्रयत्नात, ८४ वर्षीय वृद्धा तिच्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करते. अंसख्य चहाच्या कपांची विक्री करून आणि उदार लोकांच्या मदतीमुळे ती जगते आहे. हे लोक तिला तांदूळ, मसूर आणि कधीकधी रोख रक्कम देतात. तिला फक्त पक्के किंवा कायमस्वरूपी घर हवे आहे कारण ती सध्या ज्या घरात राहत आहे ते जीर्ण झाले आहे आणि ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते.
इतक्या स्वस्तात ती इडली कशी विकते आजी?

रेशनचे धान्य आणि कडधान्ये वापरून धनम पाटी इडलीचे पीठ आणि सांभर तयार करते. तिला मिळणाऱ्या रेशनच्या वस्तू तिने उत्पादन केलेल्या प्रमाणासाठी अपुरे पडते पण विश्वासू ग्राहक आणि हितचिंतक तिला त्यांच्या रेशनच्या तांदळ देऊन मदत करतात. तिची सद्भावना आणि तिचा उदार स्वभाव हेच इडलीच्या कमी किंमतीमागील प्राथमिक कारणे आहेत.
८० च्या दशकात ती अजूनही चांगली का काम करत आहे असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. त्यावर ती म्हणते, “माझा मुलगा आणि मुलगी देखील संघर्ष करत आहेत असे ती स्पष्ट करतात त्यामुळे मला त्यांना त्रास द्यायचा नाही”