Premium

झोपू आनंदे: घोरासुराचा वध (उपाय)

स्लीप ॲप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय म्हणजे ‘सीपॅप.’ हे यंत्र एका छोट्या खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम. १९८० साली सर्वप्रथम कॉलीन सुलीव्हान या डॉक्टरने या यंत्राचा वापर केला.

treatment for snoring
सर्वप्रथम म्हणजे स्लीप ॲप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय म्हणजे सीपॅप (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

डॉ. अभिजित देशपांडे (निद्राविकारतज्ज्ञ)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात घोरण्याचा तपशीलवार अभ्यास/ चाचण्या यावर ऊहापोह होता. या चाचण्यांतून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. केवळ घोरणे आहे का स्लीप ॲप्नीयादेखील आहे? घोरण्यामुळे मेंदू किती वेळेला उठतोय? ऑक्सिजन कमी होतोय का? कुठल्या तऱ्हेच्या झोपेत अथवा कुठल्या कुशीवर प्रॉब्लेम जास्त आहे. अशा एक ना दोन, अनेक प्रश्नांची उत्तरे या चाचण्यांमुळे मिळतात. या उत्तरानंतरच उपाययोजना ठरवता येते. सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या उपायांचा विचार करू या आणि नंतर सर्वसाधारणत: कुठल्या परिस्थितीत विशिष्ट उपाय जास्त किफायतशीर ठरतात यावर विवेचन असेल.

सर्वप्रथम म्हणजे स्लीप ॲप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय जो सर्व देशांमध्ये ‘गोल्ड स्टॅन्डर्ड’ मानला जातो त्यावर विचार करू या. या यंत्राचे नाव आहे, सीपॅप (CPAP). हे यंत्र एका छोट्या खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम! घोरण्यामध्ये अथवा स्लीप ॲप्नीयामध्ये आपल्या घशाची नळी कशी आकुंचित होते हे मागील लेखांत सांगितले आहेच. कल्पना करा की एखादी खरी नळी उघडायची असेल तर आपण विशिष्ट दाबाने हवा सोडतो. फक्त इथे खरी नळी नसून मानवी घसा असल्याने दाबाची अचूकता महत्त्वाची ठरते. गंमत म्हणजे १९८० साली सर्वप्रथम कॉलीन सुलीव्हान या डॉक्टरने या यंत्राचा (सीपॅपचा) वापर केला. त्याला ही कल्पना पंक्चर टायरमध्ये हवा भरताना (टायर फॅक्टरीवरून जाताना) बघितल्यानंतर सुचली!

आणखी वाचा-विवाह समुपदेशन: जोडीदार – कल्पनेतील आणि वास्तवातील! 

१९८०च्या अगोदर फक्त एकच उपाय माहीत होता, तो म्हणजे गळ्याला भोक पाडणे (ट्रकीओस्टॉमी)! म्हणजे बऱ्याच वेळेला रोगापेक्षा उपाय जालीम! याच कारणाने वैद्यकीय क्षेत्रातदेखील घोरण्याकडे दुर्लक्ष केले जात असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९८० मध्ये सुलीव्हान यांनी ऑस्ट्रेलियात याचा यशस्वी वापर करूनसुद्धा अमेरिकी तज्ज्ञांनी हे स्वीकारायला तब्बल चार वर्षे लावली. खुद्द सुलीव्हान यांनीच मला त्यांची शोधयात्रा सांगितली. चांगल्या कल्पना स्वीकारायला भारतातच वेळ लागतो हा माझा गरसमज दूर झाला. पण एकदा अमेरिकेत स्वीकार झाल्यानंतर मात्र सबंध निद्राविज्ञान क्षेत्राला प्रचंड उत्थापन मिळाले. गेल्या ३० वर्षांत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे यंत्राचा आकार कमी होत गेला आणि वेगवेगळ्या क्षमता वाढत गेल्या. आमच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेत मी १९८४ मधले अवाढव्य यंत्र तुलना म्हणून ठेवले आहे. या यंत्राला नळी लावली जाते आणि एक मास्क नाकावर अथवा तोंडावर ठेवला जातो.

अनेक लोकांचा प्रश्न असतो की हा मास्क लावून काय झोप येणार? आजमितीला अक्षरश: कोट्यवधी (२०१० सालांपर्यंत १२ कोटी) लोक हे मशीन दररात्री वापरत आहेत! बहुतांश व्यक्तींना काही रात्रीच्या वापरानंतर दिवसभराच्या कामात उत्साह जाणवतो. काही भाग्यवान व्यक्तींना तर एका रात्रीत जमीनअस्मानाचा फरक जाणवतो. अमेरिकन युनिव्हर्सिटीचे एक इतिहासाचे प्राध्यापक माझे रुग्ण होते. त्यांची एका रात्री सीपॅप वापरल्यानंतरची प्रतिक्रिया होती, ‘माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा इतका जिवंतपणा जाणवतोय!’

आणखी वाचा-नातेसंबंध : तुमचा बॉस ‘टॉक्सिक’ आहे का…?

काही लोकांना यंत्र वापरणे हे कृत्रिमपणा म्हणजे बाह्य मदत घेणे असे वाटते, पण तसे बघायला गेलो तर चष्मा लावणे हीदेखील बाह्य मदतच आहे! अर्थातच कुणीही मशीन लावून जन्माला आलेले नाही आणि त्यामुळे सवय व्हायला वेळ लागू शकतो. नवीन चप्पल अथवा बूट घातल्यानंतरदेखील काही काळ त्रास होतोच की.

काही लोकांच्या प्रतिक्रिया मजेदार असतात. त्यांचे म्हणणे असते की वैयक्तिकरीत्या त्यांना हा मास्क लावणे जरुरीचे वाटले तरी त्यांच्या जोडीदाराला ते रुचणार नाही आणि म्हणून ते मास्क लावत

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 18:02 IST
Next Story
विवाह समुपदेशन: जोडीदार – कल्पनेतील आणि वास्तवातील!