अपर्णा देशपांडे

एका घरातील सख्खी भावंडं, मग ते बहीण-भाऊ असो, फक्त बहिणी असो किंवा फक्त भाऊ-भाऊच असो… त्यांनी बालपणापासून ते तरुण वयापर्यंत फार मोठा काळ एकत्र घालवलेला असतो. मोठ्या बहिणीची माया, मोठ्या भावाची भक्कम सावली, छोट्यांचा खोडकर आणि तितकाच लडिवाळ सहवास अनुभवलेला असतो. बालपणापासून ते शिक्षण संपेपर्यंत आई-वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली ही भावंडं कालांतरानं आपापल्या मार्गी लागतात. आकांक्षांना पंख फुटतात. भौतिक अंतर वाढत जातं. अनेक नवी विषयांची रुजवात होतं आणि रोजचा सहवास हळूहळू विरत जात दुर्मिळ होत जातो. सगळ्यांची आर्थिक बाजू भक्कम असेल तर एकमेकांची जबाबदारी घेणं हा प्रकार उरत नाही. सणावारी चार दिवस एकत्र भेटणं, एकमेकांना प्रेमाच्या भेटवस्तू देणं आणि पुन्हा आपापल्या मार्गी लागणं हा कार्यक्रम सुरळीत पार पडतो.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

हेही वाचा >>>तुम्ही कोणत्या प्रकारची आई आहात?

अनेक कुटुंबात मुलं-मुली त्यांच्या मावशीकडे, मामाकडे किंवा काकांकडे राहून शिक्षण घेताना बघितलं की समाधान वाटतं. माणसं आणि नात्याचा आब राखल्या जातोय याचा आनंद होतो. कित्येक कुटुंबात आर्थिक अडचण असलेल्या बहिणीला भाऊ मंडळी विविध रूपानं मदत करतात आणि त्याचा पुन्हा उच्चारही करत नाहीत. सगळीकडे सगळ्याच नात्यात इतकं सोपं समीकरण असलं असतं तर किती छान झालं असतं नाही? वाद-विवाद, हेवेदावे, मनमुटाव या गोष्टींना थाराच राहिला नसता ! आयुष्य किती छान सहजसुंदर झालं असतं. नात्यांमध्ये आर्थिक जबाबदारी, वडिलोपार्जित मालमत्ता वाटणी, आर्थिक स्तरातील तफावत … हे असे काटेरी विषय आले की त्या काट्यांनी अलवार नात्याची वीण उसवायला सुरुवात होते. रक्षाबंधनाचे धागे क्षीण होऊ लागतात. जन्मदात्या आई-वडिलांचं प्रेम नजरेआड होऊन त्यांचे असणं हे ओझं वाटू लागतं. हिंदीमध्ये एक म्हण आहे- ‘पैसा बडी कुत्ती चीझ हैं’. ती ऐकताना कानाला कितीही ओरखडे आले तरीही दुर्दैवानं त्यात तथ्य आहे हे कबूल करावं लागतं. हे असं का होतं ?

बालपणी काऊ-चिऊच्या दातानं पेरूची फोड वाटून खाणारी भावंडं जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा घराच्या ताब्यासाठी एकमेकांना खायला का उठतात? बालपणी वडिलांचं बोट पकडण्यासाठी प्रेमानं भांडणारे स्वतः मोठे झाल्यावर आई-वडिलांचा हात का सोडून देतात? जीर्ण आई-वडिलांची जबाबदारी घेण्याची पराकोटीची अनिच्छा का निर्माण होते? मी, मला आणि फक्त माझ्या पुरतं … या आत्मकेंद्री, स्वार्थीवृत्तीमुळे हे असं होतं. ( सगळीच अपत्यं असंच वागतात असं मुळीच नाह . अत्यंत सामंजस्य असणारी मंडळीपण आहेत, पण ती प्रजाती जरा दुर्मिळच ! )

हेही वाचा >>>देशातील महिला आमदारांची संख्या केवळ ८ टक्के!

प्रकाशराव हे कुटुंबातील सगळ्यात मोठे बंधू. त्यांच्या नंतर विकास आणि मग बहीण शालिनी अशी ती तीन भावंडं. आई-वडिलांनी गावाकडील जमीन विकून तिघांनाही उत्तम शिक्षण दिलं. प्रकाशरावांनी नोकरी लागल्या बरोबर आपल्या दोन्ही लहान भावंडांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. गावाकडील घराची डागडुजी केली. पण त्यांच्या लग्नानंतर त्यांचं कुटुंबं विस्तारल्यावर त्यांनी दोन भवंडांकडून जबाबदारीची अपेक्षा केली. बहिणीला सासरकडून परवानगी नसल्यानं तिनं हात वर केले आणि लहान भाऊ विदेशात निघून गेला. प्रकाशरावांच्या पत्नीनं नाईलाजानं का होईना सासू-सासाऱ्यांची जबाबदारी स्वीकारली, पण गावाकडील घर फक्त आपल्यालाच मिळावं या अटीवर!

घराचा विषय निघाल्यावर परदेशातील विकास आणि शालिनी यांनी कान टवकारले आणि तिघांमध्ये तुंबळ वाद झालं. वृध्द आई-वडिलांना आपल्या मुलांचं पातळी सोडू वागणं असह्य झालं आणि त्यांनी ते घर प्राथमिक शाळेला दान देऊन टाकलं आणि तिथेच स्वतःची सोयही करून घेतली .
अशावेळी मनात प्रश्न येतो, की एका आईची मुलं- जी बालपणी इतक्या प्रेमानं एकत्र वाढली असं आपण म्हणतो, मग ते त्यावेळचं प्रेम प्रेम नव्हतंच का ? की त्या वयात देवाण-घेवाण नसते म्हणून ते निरपेक्ष राहतं आणि आर्थिक गणितं आडवी आली की सगळं बिघडतं ?

हेही वाचा >>>लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : शाळकरी मुलाला स्तनांचं आकर्षण आहे, काय करावं?

या कमजोर मानसिकतेवर इलाज काय असू शकतो ? मुलांना अगदी लहान वयापासूनच एकमेकांसाठी भरपूर त्याग करण्याची शिकवण देणं, की आपण स्वतः आपल्या वागणुकीतून त्यांना आदर्श संबंधांचे धडे घालून देणे… इलाज अशक्य नसला तरी वाट अवघड आहे हे नक्की. माणसाच्या स्वभावात जोपर्यंत स्वार्थ भावना ठासून भरलेली आहे तोपर्यंत तरी ही प्रेमटिकवणारी वाट बिकटच असणार आहे.
adaparnadeshpande@gmail.com