Secret Service Director Kimberly Cheatle : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न शनिवारी रात्री झाला. एका २० वर्षीय तरुणाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने डोनाल्ड ट्रम्प या हल्ल्यात बचावले असून त्यांची सुरक्षा व्यवस्था असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिहल्ला केल्यामुळे हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे सीक्रेट सर्व्हिस यंत्रणा चर्चेत आली आहे. या यंत्रणेच्या अध्यक्षपदी किम्बर्ली चीटल या असून त्यांना या प्रकरणी २२ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसंच, या हल्ल्याला जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. या दरम्यान या किम्बर्ली चीटल कोण आहेत हेही पाहणं महत्त्वाचं आहे. (Secret Service Director Kimberly Cheatle)
कोण आहेत किम्बर्ली चीटल? (Who is Secret Service Director Kimberly Cheatle)
किम्बर्ली चीटल (Secret Service Director Kimberly Cheatle) या अमेरिकेतली सीक्रेट सर्व्हिसच्या २७ व्या संचालिका आहेत. त्यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी या संचालक पदाची सुत्रे स्वीकारली. संरक्षण आणि तपास यंत्रणांच्या एकात्मिक मिशनची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली. त्या ७ हजार ८०० हून अधिक विशेष एजंट्स, गणवेशधारी विभाग अधिकारी, कायदा अंमलबजावणी अधिकारी आणि प्रशासकीय, व्यावसायिक आणि तांत्रिक कर्मचारी यांच्या कार्यबलाचे नेृत्तृत्व करतात.
सीक्रेट सर्व्हिमध्ये येण्याआधी होत्या ग्लोबल सिक्युरिटीमध्ये
सीक्रेट सर्व्हिसच्या संचालिका होण्यापूर्वी चीटल (Secret Service Director Kimberly Cheatle) पेप्सिको येथे ग्लोबल सिक्युरिटीमध्ये वरिष्ठ संचालिका होत्या. तिथे त्यांच्यावर उत्तर अमेरिकेतली कंपनीच्या सुविधांसाठी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जोखीम व्यवस्थापन मूल्यांकन आणि जोखीम कमी करणे आदी भूमिका त्यांनी पेप्सिकोमध्ये निभावल्या आहेत.

सीक्रेट सर्व्हिसमध्ये २७ वर्षे केली सेवा
या व्यतिरिक्त पेप्सिकोमध्ये सामील होण्याआधी अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसमध्येच त्यांनी २७ वर्षे सेवा केली होती. पेप्सिकोमध्ये जाण्यापूर्वी त्या सीक्रेट सर्व्हिसमध्ये सहाय्यक संचालक पदावर होत्या. त्यावेळी चीटल यांनी १३३.५ मिलिअन बजेटचे व्यवस्थापन केलं होतं. तर, दहा ऑपरेशनल डिव्हिजन आणि तांत्रिक सुरक्षा विभागासोबत संशोधन, विकसित आणि संरक्षणासाठी जोखमी कमी करणारे तंत्रज्ञान तैनात करण्यासाठी, संरक्षित सुविधा आणि संरक्षित कार्यक्रमांसाठी सहकार्य केलं आहे. (Secret Service Director Kimberly Cheatle)
सर्व मिशनवर ठेवायच्या देखरेख
सीक्रेट सर्व्हिसमध्ये सहाय्यक संचालक (Secret Service Director Kimberly Cheatle) म्हणून काम करण्यापूर्वी चीटल यांनी अटलांडा फील्ड ऑफिसच्या प्रभारी विशेष एजंट म्हणून काम केलं आहे. सर्व मिशन संबंधित तपासासाठी देखरेख ठेवण्याचं काम, जॉर्जिया राज्यातील संरक्षणात्मक बुद्धिमत्ता आणि संरक्षणात्मक भेटी आदी जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. चीटल यांची फेब्रुवारी २०१६ मध्ये जेम्स जे. रॉली ट्रेनिंग सेंटरच्या प्रभारी विशेष प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ कार्यकारी सेवेत नियुक्ती करण्यात आली. तिथे त्यांनी संस्थेसाठी प्रशिक्षण आणि करिअर विकासाच्या सर्व पैलुंचे निर्देश आणि समन्वय केले. नंतर प्रशिक्षण कार्यालयासाठी (Training Centre) उपसहाय्यक संचालक म्हणून काम केले. सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
सीक्रेट सर्व्हिसचं कार्य काय? (What is Secret Service)
१८६५ साली स्थापन झालेल्या सीक्रेट सर्व्हिसचं काम पूर्वी डॉलरची बनावटगिरी रोखण्यासाठी करण्यात आली होती. परंतु, १९०२ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ली यांची न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर खोट्या नोटांचे चलन रोखण्यासह राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणाचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली. सध्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्या सुरक्षेबरोबर आर्थिक फसवणुकीसह गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवते. या व्यतिरिक्त गुप्त सेवा देखील राष्ट्रपती आणि त्यांच्या जोडीदारांना आयुष्यभर संरक्षण प्रदान करण्यासाठी जबाबदार आहे. (Secret Service Director Kimberly Cheatle)