२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्ण जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. यावर्षी योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी योग दिनाचा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांचे लक्ष ‘ती’ने वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘ती’ योगासने करत होती. कोण होती ‘ती’ हे जाणून घेऊया…

२१ जून, २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी त्यांच्या सह योगासने करण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना अॅनेलीज रिचमंड उपस्थित होती. अॅनेलीज रिचमंड १५ वर्षांपासून योगासने आणि सुदर्शन क्रिया करत आहे.
या योगसत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्वांना संबोधित केले. योगाभ्यासाचे महत्त्व, मानसिक आरोग्य, वसुधैव कुटुम्बकम आणि योग दिन यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही संकल्पनासुद्धा त्यांनी या मार्गदर्शन वर्गात मांडली.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Court Grants Pre Arrest Bail, Rashtriya Swayamsevak Sangh, name misusing Case, rss name misusing Case, Pre Arrest Bail, rss, marathi news, nagpur news,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग, न्यायालय म्हणाले…
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश


कोण आहे अॅनेलीज रिचमंड ?

अॅनेलीज रिचमंड या नृत्यांगना आहे. ४७ वर्षीय अॅनेलीज रिचमंड यांनी आजवर अनेक योगवर्गाचे नेतृत्व केलेले आहे. ८-१२ वर्षे वयोगटासाठी त्यांनी आसनांच्या सरावाचे सत्रही घेतलेले आहे. अ‍ॅनेलिस रिचमंडने मेट्रोपॉलिटन ऑपेरासह व्यावसायिक नृत्यांगना म्हणून न्यूयॉर्क शहरात १५ वर्षे काम केलेले आहे. तिचा योगासनांचा प्रवास वयाच्या १८व्या वर्षांपासून सुरु झाला. शारीरिक क्रिया, स्ट्रेचिंग एवढापुरताच तो तेव्हा मर्यादित होता परंतु, २३ व्या वर्षी श्री श्री रविशंकरच्या आर्ट ऑफ लिव्हिंग (AOL) च्या माध्यमातून योगाच्या संपर्कात आली. तेव्हा तिला योगासने आणि योगतत्त्वज्ञान याची माहिती झाली. ती वयाच्या २३ व्या वर्षांपासून योगाभ्यास करत आहे. नृत्यामध्ये श्वासावर नियंत्रण, शरीराची लवचिकता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. यासाठी तिला योगाभ्यासाची मदत झाली, असे ती सांगते. योगाभ्यामुळे प्रभावित होऊन तिने नंतर SKY कॅम्पस हॅपीनेस प्रोग्रामची स्थापना केली. हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी एक कल्याणकारी कार्यक्रम आहे. संपूर्ण अमेरिकेतील १०० हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी या कार्यक्रमाचा लाभ घेतात. रिचमंड युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न मेनमध्ये फॅकल्टी मेंबर म्हणूनही काम करते आणि येल युनिव्हर्सिटी, एमआयटी, यूपीईएनएन आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी सारख्या उच्चस्तरीय संस्थांमध्ये त्यांची व्याख्यानेदेखील होतात.

अॅनेलीज रिचमंड आणि भारत

रिचमंड या श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे योगासनांचे प्रशिक्षण घेत आहेत. २००६ मध्ये, रिचमंड हिने योग शिकण्यासाठी बेंगलोरला AOL कॅम्पसमध्ये प्रवेश घेतलेला. तेव्हापासून तिचा भारताशी योगनाते आहे. तिने अनेक प्रसंगी देशात प्रवास केला आहे आणि तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनासाठी देश आणि योगाची प्रशंसा केली आहे. तिच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये, ती योगाविषयी लिहिते, “आर्ट ऑफ लिव्हिंगचा माझा पहिला अनुभव आणि श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणीने मी समृद्ध झाले. मला कामात जास्त आनंद वाटू लागला. जोपर्यंत मी शिकलेल्या योगासनांचा सराव करत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट मला त्रासदायक वाटत नाही. कामाचा ताण येत नाही. मला व्यासपीठावरील आत्मविश्वास योगासनांमुळे आला. ती पुढे सांगते की याच भावनेने तिला आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी शिकवायला सुरुवात केली. माझ्यामध्ये, माझ्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यामध्ये यामुळे आमूलाग्र फरक पडला. आज रिचमंड ही आर्ट ऑफ लिव्हिंग-अमेरिकेसाठी शिक्षक प्रशिक्षण वर्गाची संचालिका म्हणून कार्यरत आहे. तसेच ५ देशांमधील १२०० योग शिक्षकांना ती प्रशिक्षित करते.

तिच्या आजवरच्या कार्यामुळे तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योगासने करण्याचा मान मिळाला. ती प्रख्यात नृत्यांगना असून नृत्यसाधनेमध्ये तिला योगाभ्यासाचे सहकार्य लाभले आहे